P Chidambaram On 2000 Note: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत लोक 2000 रुपयांच्या नोटा एकाच वेळी 20,000 रुपयांपर्यंत बदलू शकतील. या निर्णयावर माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
चिदंबरम म्हणाले की, नोटाबंदीच्या काही आठवड्यांनंतर RBI वर दबाव आणून 500 ची नोट परत आणण्यात आली. RBI ने 1000 रुपयांची नोटही परत आणली तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही.
पी. चिदंबरम यांनी ट्विटवर लिहिले की, नोव्हेंबर 2016 मध्येच आम्ही सांगितलं होतं की नोटबंदीचा निर्णय योग्य नाही, 2000 च्या नोटेची छपाई व्यवहार्य नाही, हा निर्णय लवकरच मागे घ्यावा लागेत. त्यावेळी आम्ही बरोबर बोलत असल्याचं सिद्ध झालंय.
P Chidambaram On 2000 Note: काय म्हणाले पी. चिदंबरम?
केंद्रातील सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदीचा मूर्खपणाचा निर्णय लपवण्यासाठी 2,000 रुपयांची नोट चलनात आणण्यात आल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. या काळात 500 आणि 1000 च्या नोटा हे व्यवहाराचे प्रसिद्ध माध्यम होते.
नोव्हेंबर 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा केली होती. दरम्यान, काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारने केला होता.
शुक्रवारी संध्याकाळी जारी केलेल्या निवेदनात, आरबीआयने म्हटले आहे की सध्या चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंतच कायदेशीर निविदा असतील. आरबीआयने बँकांना 30 सप्टेंबरपर्यंत या नोटा जमा करण्याची आणि बदलण्याची सुविधा देण्यास सांगितले आहे. 2000 रुपयांच्या नोटा 23 मे पासून बँकांमध्ये बदलता येणार आहेत. मात्र एकावेळी फक्त 20,000 रुपयांच्या नोटा बदलल्या जातील.
या बातम्या वाचा:
- RBI on 2000 Note: मोठी बातमी! 2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार
- Rs 2000 Currency Note Exchange: तुमच्याकडे 2000 रुपयांची नोट आहे? घाबरू नका, आरबीआयचे निर्देश वाचा एका क्लिकवर...
- Currency Note : किंग जॉर्ज, अशोक स्तंभ ते महात्मा गांधी... असा आहे भारतीय नोटांवरील चित्रांचा प्रवास