मुंबई : सलग 3 महिने रेशनिंगच्या दुकानातून धान्य न घेतल्यास शिधापत्रिका तात्पुरत्या रद्द होणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाच्या अमंलबजावणीसाठी 52 हजार रेशनिंगच्या दुकानात पॉज मशिन बसवण्याचं काम सुरु आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकड़ून सध्या शिधापत्रिका आधार कार्डशी जोडण्याचं काम सुरु आहे. त्याद्वारे बोगस शिधापत्रिकांना आळा बसण्यास तसेच बनावट नावे वगळण्यास मदत होणार आहे.
सध्या पॉज मशिन बसवण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरु असून या योजनेत चार कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या मशिनसाठी राज्य सरकार कुठलीही गुंतवणूक करणार नसून संबंधित कंपनीला प्रत्येक क्विंटलमागे कमिशन देण्यात येणार आहे.