गांधीनगर : देशातील महिलांवरील अत्याचार कमी व्हावेत, महिलांना सुरक्षितपणे जगता यावे म्हणून कायद्यात वेळोवेळी बदल करण्यात आले. गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा कशी होईल, यासाठी यंत्रणा प्रयत्न करताना दिसते. मात्र कायद्याचाही धाक न राहिल्यामुळे काही ठिकाणी अघोरीपणाचा कळस गाठल्याच्या घटना समोर येतात. गुजरातमधील भरूच या ठिकाणही असाच एक हादरून सोडणारा प्रकार समोर आला आहे. बलात्कार प्रकरणात आरोपी असलेल्या एका क्रुरकर्म्याने त्याच पीडित महिलेवर आणखी दोन वेळा कथितपणे बलात्कार केला आहे. जामिनावर सुटल्यानंतर आरोपीने हे कृत्य केल्याचा दावा केला जातोय. 


नेमका प्रकार काय आहे? 


पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील भरूच या ठिकाणी शैलेस राठोड या 35 वर्षीय आरोपीने एका 70 वर्षीय वृद्ध महिलेवर दोन वेळा बलात्कार केला आहे. हा आरोपी याच महिलेवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्याखाली  तुरुंगात होता. जामिनावर सुटका होताच, त्याने हे दुष्कर्म केले आहे. या आरोपीने पीडित महिलेचा याआधीही लैंगिक छळ केलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 डिसेंबर 2024 आणि 24 डिसेंबर 2024 अशा दोन वेळा पीडित महिलेवर अत्याचार केला आहे. ही माहिती पोलीस उपअधीक्षक पीएल चौधरी यांनी दिली आहे. विशेष म्हणजे दृष्कृत्य केल्यानंतर आरोपीन महिलेला धमकावल्याचाही आरोप आहे. घडलेली घटना कोणाला सांगितली तर त्याचे वाईट परिणाम होतील, अशी धमकीच आरोपीने पीडित महिलेला दिली होती. 


18 महिन्यांपूर्वी झाला होता महिलेवर अत्याचार


पीडित 70 वर्षीय महिला अमोड पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आल्यानंतर हा प्रकार उघडकी आला आहे. महिलेने तक्रार देताच आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राठोड याने याच महिलेवर 18 महिन्यांपूर्वी याच पीडित महिलेवर अत्याचार केला होता. याच प्रकरणात तो तुरुंगात होत. मात्र जामिनावर सुटका झाल्यानंतर या आरोपीने पीडित महिलेवर पुन्हा एकदा बलात्कार केला आहे. तसा दावा पीडित महिलेने केला आहे. 


दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केले असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय समोर येणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा :


High Court: मृतदेहासोबत शारिरीक संबध ठेवल्यास बलात्कार होतो का? जाणून घ्या हायकोर्ट काय म्हणालं?


मोठी बातमी! चंद्रपूरच्या कोरपणा येथील कॉन्वेंट शाळेतील बलात्कार प्रकरणी मोठी कारवाई, शाळेच्या संचालकावरही गुन्हा दाखल 


गुंगीचं औषध पाजून तरुणीवर सामूहिक बलात्कार, गुन्हा दाखल होताच भाजपचा पदाधिकारी पदमुक्त