चंदीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमविरोधातील बलात्कार प्रकरणी विशेष सीबीआय कोर्ट 25 निकाल देणार आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर उद्या पंचकुला सीबीआय कोर्ट उद्या निकाल देणार आहे.
राम रहीमबाबत येणारा निकाल पाहता हरियाणा सरकारने कलम 144 लावलं असून राज्यातील शाळा आणि कॉलेज 25 ऑगस्टला बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय 24 आणि 25 ऑगस्टला सरकारी सुट्टी जाहीर केली आहे.
सुनावणीआधी राम रहीमचे समर्थक प्रशासनाला खुलं आव्हान आणि धमकी देत आहे. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर पंजाब आणि हरियाणा राज्यांतील कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याने 50 पॅरामिलिटरी फोर्सच्या जवानांची टीम तैनात करण्यात आली आहे.
पंचकुलाला छावणीचं रुप
पंचकुला जिल्ह्यात सध्या दोन हजारांहून जास्त जवान सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. जिल्ह्याला छावणीचं स्वरुप आलं आहे. रस्त्यांवर बॅरिकेटिंग केली आहे. हरियाणाच्या 21 जिल्ह्यातील सुरक्षेत वाढ केली आहे. तर संपूर्ण राज्यात कलम 144 लावण्यात आलं आहे.
क्रिकेट स्टेडियमचं तात्पुरत्या जेलमध्ये रुपांतर
बाबासंदर्भात येणारा निकाल पाहता पंजाब आणि हरियाणा सरकारला हायअलर्ट देण्यात आला आहे. 25 ऑगस्टला निर्णय येणार असल्याने चंडीगडच्या सेक्टर 16 मधील क्रिकेट स्टेडियम तात्पुरत्या तुरुंगात बदलण्याची शक्यता आहे.
डेरा सच्चा सौदा आणि बाबा राम रहीमचे वाद
2001 - साध्वीचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप
2002 - पत्रकार रामचंद्रच्या हत्येचा आरोप
2003 - डेरा सच्चा सौदाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रणजीत सिंह यांचं हत्याकांड
2007 - गुरु गोविंद सिंह यांच्या वस्त्रांवरुन शिखांसोबत वाद
2010 - डेराचे माजी व्यवस्थापक फकीर चंद बेपत्ता होण्याचं प्रकरण
2012 - डेरा सच्चा सौदाच्या 400 साधूंना नपुंसक केल्याचा आरोप
23 व्या वर्षात डेरा सच्चा सौदाचा प्रमुख
1967 मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये जाट शिख कुटुंबात जन्मलेल्या बाबा राम रहीमला तत्कालीन डेरा प्रमुख सतनाम सिंह यांनी 23 सप्टेंबर 1990 मध्ये आपला वारसदार घोषित केलं. वयाच्या 23 व्या वर्षी बाबा राह रहीम डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बनला. यानंतर बाबा राम रहीम यांच्या नेतृत्त्वात डेरा सच्चा सौदाची लोकप्रियता वाढू लागली. बाबा राम रहीमचा डेरा सच्चा सौदा सामाजिक एकोपा, नशामुक्ती आणि मानवसेवेपासून सर्वधर्मसमभावचा संदेश देता. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे.
पाच कोटी भक्त, अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत साम्राज्य
डेरा सच्चा सौदा आश्रम सुमारे 68 वर्षांपासून सुरु आहे. डेरा सच्चा सौदाचं साम्राज्य देश परदेशात पसरलं आहे. अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यूएईपर्यंत डेराचे आश्रम आणि अनुयायी आहेत. जगभरात डेराचे जवळपास पाच कोटी अनुयायी आहेत. ज्यापैकी सुमारे 25 लाख अनुयायी एकट्या हरियाणात आहेत.
बाबाला सिनेमाचा शौक
बाबाला चित्रपटांचाही शौक आहे. एक, दोन नाही तर पाच सिनेमात त्याने मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आहे. एमएसजीपासून जट्टू इंजिनिअरपर्यंतच्या त्याच्या सगळ्या चित्रपटांना यश मिळालं आहे.
राम रहीम बलात्कार निकाल: पंजाब-हरियाणात अलर्ट, 2 दिवस शाळा-कॉलेज बंद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Aug 2017 08:36 AM (IST)
राम रहीमबाबत येणारा निकाल पाहता हरियाणा सरकारने कलम 144 लावलं असून राज्यातील शाळा आणि कॉलेज 25 ऑगस्टला बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय 24 आणि 25 ऑगस्टला सरकारी सुट्टी जाहीर केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -