Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिरात (Ram Mandir) प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पाडला. प्रभू श्रीरामाच्या मनमोहक मूर्तीने भाविकांच्या काळजात घर केले आहे. सुंदर, आकर्षक दागिन्यांनी ही मूर्ती सजवण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिरातील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या हातात एका धनु्ष्य आणि एका हातात बाण आहे. श्रीरामाच्या हातात असलेल्या धनुष्य-बाणाचे खास महत्त्व आहे.
कोणते आहे धनुष्य?
प्रभू श्रीरामाच्या हातातील धनुष्याला कोदंड म्हणतात. असे म्हणतात की या धनुष्यातून मारलेला बाण नेहमी लक्ष्यापर्यंत पोहोचतो. याच्याशी संबंधित एक कथा अशी आहे की, भगवान राम जेव्हा रावणाच्या लंकेवर आक्रमण करण्यासाठी पुढे जात होते, तेव्हा समुद्र त्यांच्या मार्गात अडथळा बनत होता. त्यानंतर श्रीरामांनी या धनुष्यातून समुद्रावर बाण सोडला आणि संपूर्ण समुद्राचे पाणी आटले.
बाणाचे महत्त्व काय?
आचार्य वल्लभ यांनी एबीपी न्यूजशी संवाद साधताना म्हटले की, प्रभू श्रीरामाच्या हाती जो बाण आहे, त्याला अमोघ बाण म्हणतात. हा बाण सुटल्यावर आपलं लक्ष्य भेदतोच. श्रीरामाच्या प्रत्येक छबीत हाच बाण दिसत असल्याची माहिती त्यांनी दिली.
आभूषणात कोणते रत्न?
प्रभू श्रीरामाची मूर्ती सजवण्यासाठी अतिशय मौल्यवान दागिने वापरण्यात आले आहेत. मूर्तीच्या डोक्यावर सोन्याचा आणि हिऱ्यांचा मुकुट असून त्याच्या मध्यभागी पान वापरण्यात आले आहे. श्रीरामाच्या कपाळावर असलेला टिळा हा हिरा आणि माणिकाचा आहे. तर कानातील आभूषणांत मोती आणि माणिक यांचा वापर करण्यात आला आहे. गळ्यातील हारामध्ये माणिक, मोती आणि हिऱ्यांचाही वापर केला आहे.