जयपूर : राजस्थानमधील उदयपूरमध्ये अंगावर काटा आणणारा अपघात (Rajasthan Horrific Road Accident ) झालाय. गोगुंदा पिंडवाडा महामार्गावर जीप डिव्हायडरला धडकल्यामुळे भीषण अपघात (jeep overturning on udaipur national highway) घडला. यामध्ये पाच जिवलग मित्रांचा मृत्यू (5 Dead) झाला. रविवारी रात्री हा भीषण अपघात झाला. बेकरिया पोलिस स्टेशनमध्ये याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी प्रभू सिंह यांनी सांगितलं की, रविवारी रात्री जीप रस्त्याच्या डिव्हायरला धडकल्यामुळे पलटी झाली. त्यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांना उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. सर्वांचं वय 22 ते 25 वर्षांच्या आसपास आहे. 


राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात रविवारी रात्री भीषण अपघात झाला. पाच मित्र आपल्या घरी निघाले होते. त्यावेळी त्यांची जीप डिव्हायडरला धडकली. अपघात इतका भीषण होता, की पोलिसांना मृतदेहाचे तुकडे गोळा करावे लागले. तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जणांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करत होते, त्यावेळी गाडीमध्येच त्यांचं निधन झालं. पोलिसांनी अपघाती निधानाची नोंद केली आहे. पाचही जणांचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. बेकरिया पोलिस स्टेशन अंतर्गत ही घटना घडली आहे. 


महामार्गावर झाला भीषण अपघात 


गोगुंदा पिंडवाडा महामार्गावर उखलियाजवळ रविवारी रात्री भीषण अपघात झाला. पाच मित्र जीपमधून घरी निघाले होते, त्यावेळी उखलियाच्या भोगद्याजवळ जीपवरील नियंत्रण सुटले. जीप थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. जीपचा वेग जास्त असल्यामुळे ती पलटी झाली. एखाद्या चित्रपटाप्रमाणे जीप हवेतून थेट दुसऱ्या बाजूला गेली. या भीषण अपघातामध्ये तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर उपचारासाठी घेऊन जाताना दोघांनी श्वास सोडला. अपघात इतका भीषण होता की, पोलिसांनी मृतदेहाचे तुकडे गोळा करावे लागले. 


पोलिसांची घटनास्थळावर धाव -


स्थानिकांनी अपघाताची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. दुर्देवी अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेलाही तात्काळ पाचारण करण्यात आले होते. जखमी दोन जणांना रुग्णलयात दाखल घेऊन जात असतानाच त्यांनी श्वास सोडला. अपघातामध्ये निधन पावलेल्या पाच जणांचे वय 22 ते 25 वर्षांच्या आसपास आहे. पूना, मनोज, भीमा, नाथू अशी त्यांची नावं आहे. सर्वजण घाटाबाडीच्या आसपास राहत होते.  पाच मित्रांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.