नवी दिल्ली: 'जगातील कोणतीच ताकद जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करु शकत नाही, काश्मीरच्या मुद्द्यावर चर्चा करण्याची गरज आहे.' अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काश्मीर प्रश्नावरील राज्यसभेतील चर्चेला आज उत्तर दिले.


 

'राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पण त्याचवेळी तेथे शांतता नांदावी यासाठी तात्काळ हालचाल करणंही गरजेचं आहे.' असं राजनाथ सिंह म्हणाले.

 

'जम्मू आणि काश्मीरमधील स्थिती सामान्य व्हावी यासाठी तेथील सर्वांचंच सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी हे सदन तुम्हाला आवाहन करीत आहे'. असंही राजनाथ सिंह म्हणाले.

 

दरम्यान, या मुद्द्यावरुन काँग्रेसनं संसदेच्या बाहेर मात्र पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. काश्मीर प्रश्नी पंतप्रधान मोदी इतका वेळ गप्प का आहेत?