काश्मीरात जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याकडून पाकिस्तानची पोलखोल
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2016 02:50 PM (IST)
नवी दिल्ली : काश्मीरमध्ये जिवंत पकडलेल्या एका दहशतवाद्याने पुन्हा पाकिस्तानची पोलखोल केली आहे. बहादूर अली या दहशतवाद्याने लष्कर-ए-तोयबाने आपल्याला काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी पाठवल्याची कबुली दिली आहे. एनआयएचे पोलिस महानिरीक्षक संजीव कुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. हिजबुलचा कमांडर बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर सूड घेण्यासाठी लष्कर ए तोयबाने आपल्याला पाठवल्याचा खुलासा बहादूर अलीने केल्याचं सिंह यांनी सांगितलं. एनआयएच्या माहितीनुसार बहादूर अलीला पाकिस्तानच्या सेनेकडून मिलिट्री ट्रेनिंगही दिली जात होती. पाकिस्तानी सेनेचे अधिकारी या ट्रेनिंग कॅम्पला भेटी देत असल्याचंही म्हटलं जातं. एनआयएने जारी केलेल्या एका व्हिडिओमध्ये बहादूर अली ही कबुली देताना दिसतो. पाहा व्हिडिओ :