खा. ज्योतिरादित्य शिंदेंच्या वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 10 Aug 2016 11:58 AM (IST)
अलपुझा : काँग्रेस खासदार ज्योतिरादित्य शिंदे असलेल्या एका वाहनाने वृद्धाला धडक दिल्याचं वृत्त आहे. या धडकेत 65 वर्षीय दुचाकीस्वार व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्गावर कोची-अल्लपुझा पट्ट्यातील पुथियाकावू या परिसरात हा अपघात झाला. शिंदे दिल्लीहून कोचीला विमानतळावर उतरले. त्यानंतर चर्थालामध्ये एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ते निघाले होते. अपघातावेळी शिंदेंसोबत गाडीत तीन काँग्रेस कार्यकर्ते होते, तर चालक गाडी चालवत होता. अपघातानंतर ज्योतिरादित्य यांनी ट्वीट करुन शोक व्यक्त केला आहे. 'हादरुन गेलो... कोचीन आणि अलेप्पी दरम्यान दुर्दैवी अपघात. रुग्णालयात नेण्याची तात्काळ व्यवस्था केली. पीडित कुटुंबाच्या भेटीला जात आहे' असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. https://twitter.com/JM_Scindia/status/763278855511703552 अपघातात मृत्युमुखी पडलेल्या, पुथियाकावूमध्ये राहणाऱ्या 65 वर्षीय शशी यांची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शशी यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला.