रजनीकांत 'पद्मविभूषण' तर सानिया पद्मभूषणने सन्मानित
एबीपी माझा वेब टीम | 12 Apr 2016 09:26 AM (IST)
नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्म पुरस्कारांच वितरण करण्यात आलं. अभिनेते रजनीकांत, गिरीजा देवी, रामोजी राव, पार्श्वगायक उदित नारायण, टेनिसपटू सानिया मिर्झा, अभिनेत्री प्रियांका चोप्रा, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, इनाडू ग्रुपचे चेअरमन रामोजी रावा यांच्यासह 56 मान्यवरांचा पद्म पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सुपरस्टार रजनीकांत आणि रामोजी राव यांचा पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च पुरस्कारने गौरव करण्यात आला. तर सानिया मिर्झा आणि उदित नारायण यांचा पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं. याशिवाय प्रियांका चोप्रा आणि बाहुबलीचा दिग्दर्शक एसएस राजमौली यांना पद्मश्री पुरस्कार देऊ गौरव केला.