मुंबई : राजधानी एक्स्प्रेससह शताब्दी आणि दुरांतो ट्रेनमधील बुक न झालेल्या सीट्स प्रवाशांना सवलतीमध्ये देण्याचा विचार रेल्वे प्रशासनानं चालवला आहे. 15 डिसेंबरपासून प्रायोगिक तत्वावर ही सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.
ट्रेनमधील आरक्षण न झालेल्या जागा 10 टक्के सवलतीत देण्यात येणार आहेत. 15 डिसेंबरपासून 31 मे 2017 पर्यंत ही सुविधा रेल्वेकडून दिली जाईल.
रेल्वे निघण्यापूर्वी या सुविधेचा लाभ घेता येईल. चार्ट तयार झाल्यानंतर ट्रेन सुटण्याआधी 30 मिनिटांपर्यंत या जागा बुकिंगसाठी उपलब्ध होणार आहेत. रेल्वे स्टेशनवरील बुकिंग काऊंटरवर तसंच वेबसाईटवरही तिकीट बुक करता येणार आहे.