Rajasthani Accident : राजस्थानमधील कोटा येथे कार नदीत पडून 9 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व लोक एका लग्नाला जात होते. या अपघाताची माहिती देताना कोटा पोलिसांनी सांगितले की, कार चंबल नदीत पडल्यानंतर 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांमध्ये नवरदेवाचाही समावेश आहे.
अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन घटनास्थळी पोहोचले आणि बचाव पथकाच्या मदतीने गाडी नदी बाहेर काढण्यात आली. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी मोठ्याप्रमाणात लोकांची गर्दी जमली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात झाल्याच्या 2 ते 3 तासानंतर बचाव कार्यास सुरुवात झाली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या भीषण अपघातावर दुःख व्यक्त केलं आहे. हा अपघात त्यांच्या लोकसभा मतदार संघात घडला आहे. ते म्हणाले आहेत की, ''कोटामध्ये कार चंबळ नदीत पडून झालेले मृत्यू हृदय पिळवटून टाकणारे आहेत. देव दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. त्यांच्या दुःखाच्या काळात माझी सहानुभूती त्यांच्यासोबत आहेत.''
महत्त्वाच्या बातम्या:
- Trending News : 'या' प्रसिद्ध यूट्यूबरने 42 सेकंदात 1.75 कोटी कमावले, 'ही' नवीन पद्धत स्वीकारली
- Petrol Diesel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
- Prashant Kishor : प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सांगितला भाजपला हरवण्याच उपाय, जाणून घ्या काय म्हणाले रणनीतीकार?
- निवडणुका घ्या; मात्र 80 टक्के लसीकरण करा, प्रशांत किशोर यांचा निवडणूक आयोगाला सल्ला
- Prashant Kishor: राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद ओळखावी– प्रशांत किशोर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha