Prashant Kishor : गेल्या काही वर्षांपासून देशातील सर्वात जुना असणारा काँग्रेस (Congress) पक्ष अनेक अडचणींचा सामना करत आहे. त्यामुळेच काँग्रेसमधील अनेकांनी पक्षाला रामराम करत इतर पक्षात प्रवेश केला आहे.
परंतु, आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि उत्तर प्रदेश विधानसभेच्या प्रभारी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. परंतु, आता निडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (Election Strategist Prashant Kishor) यांनी भाजपचा पराभव करायचा असेल तर काँग्रेसने काय करायला पाहिजे? याबाबत भाष्य केले आहे.
प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला सल्ला देताना सांगितले की, काँग्रेसला विजय मिळवायचा असेल तर पक्षात काही बदल करावे लागतील. शिवाय 2024 मध्ये भाजपचा पराभव करायचा असेल तर काय केले पाहिजे? याबाबतही प्रशांत किशोर यांनी यावेळी सांगितले.
"काँग्रेसने एक पक्ष म्हणून जो आराखडा तयार केला आहे त्यासह निवडणुकीदरम्यान लोकांपर्यंत पोहण्याची पद्धत आणि लोकांशी संपर्क साधण्याच्या पद्धतीत मूलभूत त्रुटी आहेत." असे प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर म्हणाले, "काँग्रेसचा अध्यक्ष कोणी व्हावे हे मी सांगणार नाही. परंतु, फक्त इतर पक्षांना एकत्र करून भाजपचा पराभव करता येणार नाही. सर्व विरोधक म्हणजे काँग्रेस नाही हे काँग्रेस पक्षाला समजायला पाहिजे. काँग्रेसला सर्वांनी एकत्र येऊन ठरवायला पाहिजे की, नवा अध्यक्ष कोणाला बनवले पाहिजे."
"पक्षाच्या पातळीवर काँग्रेस खूप खाली घसली आहे. सर्वात आधी काँग्रेला निर्णय प्रक्रियेत बदल करणे गरजेचे आहे. शिवाय स्थानिक नेत्यांना ताकद द्यायला पाहिजे. याबरोबरच निर्णय प्रक्रीयेला केद्रीयकृत केले नाही पाहिजे. इतर नेत्यांनाही निर्णय घेण्याचे अधिकार मिळाले पाहिजेत. काँग्रेसला पुढे विजय मिळवण्यासाठी पक्षात खूप बदल केले पाहिजेत. याबरोबरच जो कोणी अध्यक्षपदी निवडला जाईल तो पूर्ण वेळ अध्यक्ष असला पाहिजे." असा सल्ला प्रशांत किशोर यांनी काँग्रेसला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- चेंबूरमध्ये पावडरचा पाऊस; एचपीसीएलच्या प्लांटमधून गळती, माहुलवासियांमध्ये भीती
- BEST Super Saver Plan : बेस्टचे सुपर सेव्हर प्लान; एका दिवसापासून 84 दिवसांपर्यंतच्या प्रवासाचं नियोजन शक्य
- मुंबई पालिकेच्या 117 अधिकाऱ्यांना कोरोना पावला? निलंबित अधिकाऱ्यांना पुन्हा कामावर घेतलं
- मध्य रेल्वेचे ग्रहण सुटणार? खारेगाव रेल्वे उड्डाणपूल सुरू होण्याची पालिकेची माहिती