नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने सोमवारी आपली नवी सुवर्ण ट्रेन (गोल्ड स्टॅण्डर्ड) योजना सुरु होत आहे. या योजनेचं बजेट तब्बल 25 कोटी रुपये असून, सुरुवातीच्या टप्प्यातील पहिली ट्रेन दिल्ली ते काठगोदाम शताब्दी एक्स्प्रेस धावेल. या योजनेअंतर्गत राजधानी आणि शताब्दीसह इतर प्रीमियम ट्रेनचा कायापालट करण्यात येणार आहे.
प्रत्येक ट्रेनवर 50 लाख रुपये खर्च होणार
या योजनेअंतर्गत ट्रेनमधील कॅटरिंगसाठी ट्रॅली सर्व्हिस, नवे अत्याधुनिक कोच, स्वच्छ शौचालय, त्यासोबतच ऑटोमॅटिक दरवाजांची आदींची व्यवस्था केली जाईल. या योजनेअंतर्गत प्रत्येक ट्रेनवर 50 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. विशेष म्हणजे, सुरक्षिततेसाठी ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात येणार आहेत. तसेच या ट्रेनमध्ये सर्वाधिक आरपीएफ पोलिसांना तैनात करण्यात येणार आहे.
30 ट्रेनचा कायापालट होणार
या योजनेअंतर्गत एकूण 30 एक्स्प्रेसचा कायापालट होणार आहे. यात राजधानी एक्स्प्रेस 15 आणि शताब्दी एक्स्प्रेसच्या 15 ट्रेनचा समावेश आहे. यावर तब्बल 25 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ही योजना सुरु केली होती.
ट्रेनचं सौंदर्य, स्वच्छता आणि मनोरंजनाच्या सुविधांवर विशेष भर
आजपासून सुरु होणाऱ्या या ट्रेनमध्ये तीन गोष्टीवर विशेषत्वाने भर देण्यात आला आहे. या ट्रेनमधून प्रवास करताना प्रवाशांना वायफाय हॉटस्पॉटच्या माध्यमातून एचडी स्ट्रीमिंगचाही आनंद मिळेल.
अत्याधुनिक कोच, ऑटोमॅटिक दरवाजे, रेल्वेची आजपासून ‘सुवर्ण’ सेवा सुरु
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2017 01:10 PM (IST)
भारतीय रेल्वेने सोमवारी आपली नवी सुवर्ण ट्रेन (गोल्ड स्टॅण्डर्ड) योजना सुरु होत आहे. या योजनेचं बजेट तब्बल 25 कोटी रुपये असून, सुरुवातीच्या टप्प्यातील पहिली ट्रेन दिल्ली ते काठगोदाम शताब्दी एक्स्प्रेस धावेल.
फोटो सौजन्य : नवभारत टाईम्स
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -