नवी दिल्ली : आपल्या कुटुंबासोबत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांना रेल्वे प्रशासनाकडून एक उत्तम योजना सुरु केली आहे. आता ट्रेनमध्ये 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी खाण्या-पिण्याची खास व्यवस्था केली जाणार आहे. ‘जननी योजना’ असं या नव्या योजनेचं नाव आहे.

 

चिमुकल्यांना रेल्वेत कोणोकोणते पदार्थ मिळणार?

 

रेल्वेमधअये 5 ते 12 वर्षांच्या मुलांना दूध, गरम पाणी, चॉकलेट, बर्गर आणि पिझ्झा या पदार्थांसह अन्य वस्तूही उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. देशातील 25 रेल्वे स्थानकांवर योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.

 

कोणत्या रेल्वेस्थानकांवर योजनेचा शुभारंभ?

 

मुंबई, नागपूर, पुणे, दिल्ली, चेन्नई, हावडा, सुरत, लखनऊ, मोरादाबाद या स्थानकांसह 25 स्थानकांवर योजना सुरु करण्यात आली असून, लवकरच रेल्वेस्थानकांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

 

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर कुल्हडमध्ये चहा मिळणार

 

मुंबई आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये येणाऱ्या रेल्वे स्थानकांवर आता मातीच्या भांड्यात म्हणजेच कुल्हडमध्ये चहा मिळणार आहे. दुकानदारांच्या सोयीप्रमाणे कुल्हडमधील चहाची योजना सुरु होईल.



प्लास्टिकच्या कपांऐवजी कुल्हडमध्ये चहा दिल्यास, पर्यावरणाची हानी होण्यापासूनही रोखता येईल. मात्र, कुल्हडमध्ये चहा देण्यास सुरुवात झाली, तर चहाचे दरही वाढले जातील. कारण कुल्हडसाठी प्रवाशांना 2 ते 3 रुपये जास्त मोजावे लागतील.