एक हजाराची नवी नोट लवकरच येणार!, अर्थ मंत्रालयाची माहिती
एबीपी माझा वेब टीम | 10 Nov 2016 11:55 AM (IST)
नवी दिल्ली: पाचशे आणि 2 हजार रुपयांच्या नव्या नोटांनंतर आता हजार रुपयांची नवी नोटही चलनात येणार आहे. अर्थ मंत्रालयाचे सचिव शक्तीकांता दास यांनी ही माहिती दिली आहे. राजधानी दिल्लीत अरुण जेटलींच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शक्तीकांता दास यांनी ही माहिती दिली आहे. येत्या काही महिन्यात नव्या सुरक्षा मानकांसह एक हजार रुपयांची नोट चलनात येणार आहे. या नोटेचे रुपरंग आणि आकार पहिल्या नोटेहून पूर्णतः वेगळं असणार आहे. तसेच येत्या काळात सर्वच नोटा या नव्या स्वरुपात येणार असल्याची माहितीही अर्थ सचिवांनी दिली आहे. त्यामुळे सर्वच नोटा या आता वेगळ्या रंगात आणि डिझाईनसह येत्या काही काळात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याने काल बँका बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आज नोटा बदलण्यासाठी तसंच पैसे जमा करण्यासाठी बँके आणि पोस्ट ऑफिसमध्ये चांगलीच झुंबड उडणार आहे. आजपासून ते 30 डिसेंबरपर्यंत नागरिकांना त्यांच्याकडून पाचशे आणि हजारांच्या बदलून मिळणार आहेत. यासोबतच दोन हजारच्या नव्या नोटा आजपासून चलनात येणार आहेत. संबंधित बातम्या