या प्रकारावेळी विरोधी बाकांवरील आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दिशेने कॅगच्या अहवालाचे कागद फेकत होते. त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली. याच गोंधळात सत्ताधारी पक्षाकडून एकूण 12 विधेयकं मंजूर करुन घेतली.
विधानसभेच्या अध्यक्षांकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप काँग्रेस आमदारांनी केला. या घटनेनंतर सभागृहात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. संतप्त सदस्य सभागृह अध्यक्षांच्या स्थानापर्यंत पोहोचणार नाहीत, यासाठी त्यांच्या भोवती सुरक्षारक्षकांनी कडं तयार केल होतं.