नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल या ना त्या कारणाने चर्चेत असतात. केजरीवालांचा आवाज पुढचे काही दिवस बंद राहणार आहे. कफच्या त्रासामुळे झालेल्या सर्जरीनंतर त्यांना काही दिवस बोलता येणार नाही.



बंगळुरुतील नारायण हेल्थ सिटीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यावर मंगळवारी शस्त्रक्रिया करण्यात आली. जिभेची लांबी काहीशी वाढल्यामुळे त्यांच्या जिभेवर ही सर्जरी करण्यात आली. कफच्या त्रासामुळे ते जवळपास गेल्या 40 वर्षांपासून बेजार होते.


सर्जरीमुळे घशातील भागाला असलेला त्रास दुर होण्याची आशा आहे. वाढलेल्या जिभेवरील शस्त्रक्रियेनंतर केजरीवालांना त्यांच्या तोंडाला काही काळ आराम द्यावा लागणार आहे.