मुंबई : भारतीय रेल्वेमध्ये तब्बल 90 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात घोषणा केली. रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भरतींपैकी ही एक मानली जात आहे.


आरपीएफ (रेल्वे प्रोटेक्शन फोर्स) म्हणजे रेल्वे संरक्षण दलातील 9 हजार 500 उमेदवारांच्या भरतीद्वारे या प्रक्रियेला सुरुवात होईल. यापैकी 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असतील, असंही गोयल यांनी स्पष्ट केलं.


आधीच्या सरकारने उत्तर प्रदेशसोबत भेदभाव केला. राज्यात रेल्वेच्या विकासासाठी कमी गुंतवणूक केली. मात्र एनडीए सरकार सत्तेत आल्यानंतर म्हणजे 2014 मध्ये रायबरेलीत रेल्वे कोच निर्मितीला सुरुवात झाली. यावर्षी विक्रमी 700 कोचेस तयार केले जाणार असून पुढील दोन वर्षांत ही संख्या तीन हजारांवर पोहचेल, असा दावाही गोयल यांनी केला.