देशाची राजधानी दिल्ली पासून देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपर्यंत केवळ 10 तासात पोहचता यावं यासाठी रेल्वे विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच दिल्ली-हावडा हे अंतर 12 तासांत पूर्ण करता यावे यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुचनेनुसार रेल्वे विभागाने येत्या 100 दिवसांसाठीच्या कामाच रोडमॅप तयार केला आहे. त्यामध्ये या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या दोन प्रकल्पांसाठी 14 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
दिल्ली-मुंबई तसेच दिल्ली-हावडा या दोन मार्गांवरील रेल्वेचा जास्तीत जास्त वेग 160 किमी प्रती तास पर्यंत वाढवल्यास या मार्गांवरील प्रवासाचा वेळ 5 तासांनी कमी होऊ शकतो. दिल्ली-हावडा या प्रवासासाठी सध्या 17 तास लागतात. नवीन प्रकल्प पुर्ण झाल्यास हा कालावधी 12 तासांपर्यंत कमी होऊ शकतो. तर दिल्ली-मुंबई हा प्रवास देखील 15 तासांवरुन 10 तासापर्यंत कमी होऊ शकतो, असं सांगण्यात येत आहे.