पियूष गोयल काय म्हणाले?
सध्याचा आर्थिक विकास दर पाहता भारतीय अर्थव्यवस्था पाच लाख कोटीची कशी बनणार या प्रश्नावर पियुष गोयल म्हणाले की, "तुम्ही त्या हिशेबात जाऊ नका जे टीव्हीवर पाहता. जर तुम्हाला पाच लाख कोटीची अर्थव्यवस्था बनवायची असेल तर देशाला सुमारे 12 टक्के दराने वाटचाल करावी लागेल, आज त्यात 6 टक्के दराने वाढ होत आहे. आकडे आणि गणितात जाऊ नका. आईन्स्टाईनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी अशा गणितांचा उपयोग कधीही झाला नाही."
काँग्रेस जयराम रमेश यांचीही टीका
माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनीही पियुष गोयल यांच्यावर निशाणा साधला आहे. 'होय, मंत्रीजी. आईन्स्टाईनला गुरुत्वाकर्षणच्या शोधासाठी गणिताची कधीच गरज लागली नाही, कारण न्यूटनने आधीच शोध लावला होता. आता न्यूटनच्या खूप आधी आमच्या पूर्वजांना गुरुत्वाकर्षणाबद्दल सगळं माहित होतं, हे मनुष्यबळ विकास मंत्री कधी बोलतात याची प्रतीक्षा आहे.
पियुष गोयल यांची सारवासारव
मात्र आपली चूक लक्षात आल्यानंतर गोयल यांनी सारवासारव सुरु केली. आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे. "मी जे काही बोललो त्याचा निश्चितच संदर्भ होता. दुर्दैवाने काही मित्रांनी संदर्भ काढला आणि एकच वाक्य पकडल आणि खोडकर कथा बनवली," असं गोयल म्हणाले.
सोशल मीडियावर ट्रोल
केंद्रीय मंत्र्यांच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांची चांगलीच फिरकी घेतली. अनेकांनी गोयल आणि आईन्स्टाईन यांचे मीम्स तयार केले आहेत.
"अल्बर्ट आईन्स्टाईन आणि आयझॅक न्यूटनमध्ये काय फरक आहे, याचा शोध लावण्याचा प्रयत्न पियूष गोयल सध्या करत आहेत, असं एका युझरने लिहिलं आहे.
मोदी सरकारमधील वाणिज्य आणि रेल्वे मंत्री म्हणतात की, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्यासाठी आईन्स्टाईनला गणिताची कधीच मदत झाली नाही. भाजपने न्यूटनचं नाव आईन्स्टाईन ठेवलं आहे का? मूर्खांनी मूर्खांसाठी निवडून दिलेलं मूर्खांचं सरकार