गुरुवारी (23 मे) लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर काँग्रेसकडून पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली, तसेच विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अभिनंदनही केले. या पत्रकार परिषदेतच पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी इच्छा राहुल यांनी त्यांच्या आई आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली होती.
राहुल यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सोनिया गांधी यांनी पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांशी बातचित केली असता माध्यमांसमोर राजीनामा देणे चुकीचे असल्याचे सर्वांनी सुचवले. त्याउलट कांग्रेस वर्किंग कमिटीत यावर अगोदर चर्चा व्हावी आणि त्यानंतरच योग्य तो निर्णय घ्यावा, असा सल्ला वरिष्ठांनी सोनिया यांना दिला. असे सांगितले जात आहे.