12 Tughlaq Lane Bungalow:  : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आपलं निवासस्थान रिकामं केलं आहे. 12, तुघलक लेन या शासकीय निवासस्थानात राहुल गांधी यांचं वास्तव्य होतं. मात्र खासदारकी गेल्यानं त्यांना घर रिकामं करण्याची नोटीस पाठवण्यात आली. यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. चार दिवसांपूर्वी राहुल यांनी बहुतांश सामान 10, जनपथ या सोनिया गांधींच्या निवासस्थानी पाठवलं. काल संध्याकाळी त्यांनी शेवटचं शिफ्टींग केलं. ते स्वतः काही दिवसांपूर्वीच सोनिया गांधींच्या बंगल्यात शिफ्ट झाले आहेत.  


राहुल गांधी यांनी 14 एप्रिलला बंगल्यातून त्यांचे कार्यालय हलवले होते. शुक्रवारी संध्याकाळी त्यांनी शेवटचं शिफ्टींग केलं राहुल गांधींची खासदारकी रद्द  करण्यात आली आहे. हा बंगला राहुल गांधींन खासदार म्हणून देण्यात आला होता.  खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधीना सरकारी बंगला सोडण्याची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी आपले सामान 10, जनपथ येथे हलवण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी त्यांचे सामान घेऊन जाणारा ट्रक इमारतीतून बाहेर पडताना दिसला. राहुल गांधी 12 तुघलक लेन या शासकीय बंगल्याची चावी लोकसभा सचिवालयाला लवकरच परत करणार आहेत.


राहुल गांधी सरकारी बंगला सोडण्याची नोटीसीला उत्तर देताना म्हणाले की, "मी या घरात 2004 सालापासून राहत आहे. त्यामुळे या घरासोबत माझ्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. परंतु तुम्ही मला घर खाली करण्याचे पत्र पाठवले आहे. मी वेळेतच घर खाली करणार आहे". राहुल गांधींना घर खाली करण्याचे नोटीस आल्यानंतर कॉंग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यंनी त्यांनी घर देण्याची तयारी दर्शवली. यामध्ये सर्वात पहिले नाव कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे होते. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, राहुल गांधी आपल्या आईसोबत देखील राहू शकतात. जर त्यांचे मन तिथे रमले नाही तर मी त्यांची माझ्या घरी राहण्याची व्यवस्था करेल. 


23 मार्चला सुरत कोर्टानं राहुल गांधींनी दोषी ठरवलं होतं


मोदी आडनाव प्रकरणात 23 मार्चला सुरतच्या कोर्टानं राहुल गांधी यांना दोषी ठरवलं होते. त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्वही रद्द करण्यात आलं. या निर्णयाविरोधात अपील करण्यासाठी न्यायालयानं राहुल गांधींना 30 दिवसांची मुदत दिली होती. मोदी आडनावावरील वक्तव्यासंदर्भात झालेल्या राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ज्यामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द  करण्यात आली आहे. दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यास अपात्रतेची कारवाई रद्द होण्याची ही शक्यता आहे. 


संबंधित बातम्या : 


Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधी यांची याचिका सुरत न्यायालयाने फेटाळली, निर्णयाविरोधात काँग्रेस हायकोर्टात जाणार