ATM मधून पैसे काढण्यासाठी राहुल गांधी रांगेत
एबीपी माझा वेब टीम | 11 Nov 2016 04:10 PM (IST)
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील संसद मार्ग एसबीआय शाखेत राहुल गांधी पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिले. बँकेतून नोटा बदलून घेण्यासाठी आज देशभरातील बँकांसमोर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याला काँग्रेस उपाध्य राहुल गांधी देखील अपवाद नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून पाचशे आणि हजारच्या नोटा रद्दबातल करण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर सर्वसामान्य व्यक्तींपासून राजकीय व्यक्तींपर्यंत पैसे बदलून घेण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. कालपासून देशभरातील बँकात नव्या पाचशे आणि हजारच्या नोटा मिळण्यास सुरुवात झाल्याने ग्राहकांची नोटा बदलून घेण्यासाठी उडी पडली आहे. 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा ग्राहकांना बदलता येणार आहेत. दरम्यान राहुल गांधींना रांगेत पाहून दिल्लीकरांच्याही भुवया उंचावल्या. एसबीआयच्या एटीएमसमोर मोठ्या प्रमाणात रांग असल्याने राहुल गांधींनी नागरिकांशी गप्पा मारत बँकेचा व्यवहार केला.