नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी या ठिकाणी झालेल्या हिंसाचारानंतर त्या ठिकाणच्या अवैध बांधकामांवर बुल्डोजर चालवला जात आहे. त्यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे. हा बुल्डोजर जहांगीरपूरीवर नव्हे तर देशाच्या संविधानावर चालवला जात असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की, "संविधानातील मूल्यांवर हा बुल्डोजर चालवलं जात आहे. याचा उद्देश हा गरीब आणि अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणे हा आहे. भाजपने आता त्यांच्या हृदयात वसलेल्या तिसस्कारावर बुल्डोजर चालवला पाहिजे."
दिल्लीतील जहांगिरपूरी या ठिकाणी सुरू असलेल्या कारवाईला काँग्रेससह आता आम आदमी पक्षानेही विरोध केला आहे. तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या कारवाईला विरोध केला आहे.
दिल्लीतील जहांगीरपुरी भागात हनुमान जयंतीच्या दिवशी काढण्यात आलेल्या शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्या भागातील अवैध बांधकामांवर दिल्ली महापालिकेने कारवाई सुरू केली आहे.
जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामावरील दिल्ली महानगरपालिकेच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने तूर्तास जैसे थी परिस्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता या प्रकरणावर गुरुवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. मात्र, या आदेशानंतरही देऊनही महापालिकेकडून अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू आहे. मशिदीजवळील अतिक्रमण तोडण्याचं काम सुरू आहे. न्यायालयाने स्थगितीचे आदेश दिलेले असतानाही कारवाई का केली जात आहे, असा सवाल संतप्त नागरिकांमधून केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- दिल्ली हिंसाचार प्रकरण: आरोपी दिलशाद आणि गुल्लीला तीन दिवसांची पोलिस कोठडी
- Jahangirpuri Update : दिल्ली पालिकेच्या 'बुल्डोझर'ला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, पालिकेकडून तोडक कारवाई सुरुच
- Jahangirpuri Demolition Drive : जहांगीरपुरीतील हिंसाचारानंतर सर्वोच्च न्यायालयाने बुलडोझरच्या कारवाईवर लावला ब्रेक