Congress Protest : मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अगदी वेगात वाढत आहेत. आज झालेल्या वाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोल 116.67 रुपये आणि डिझेल 100.89 रुपयांवर पोहोचलं आहे. सततच्या या वाढीला  विरोध करण्याकरता आज काँग्रेसने देशव्यापी आंदोलन केलं आहे. या आंदोलनात आता काँग्रेस नेते राहुल गांधी देखील सामिल झाले आहेत.


दिल्लीच्या विजय चौकामध्ये काँग्रेस कार्यकर्त्ये आणि नेतेमंडळी जमले असताना त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकावर जोरदार टीकाबाजी केली. त्यांनी यावेळी अशी महागाई पहिल्यांदाच झाल्याचं देखील नमूद केलं.


इतिहासात असं कधी झालं नाही- राहुल गांधी


राहुल गांधी यांनी यावेळी केंद्र सरकारवर टीका करताना म्हणाले, 'काँग्रेस संपूर्ण देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या भावांविरोधात आंदोलन करत आहेत. गरिबांना याची झळ बसत आहे. इतिहासात अशी महागाई कधीच झालेलं नाही.  सरकारचा अंजेडा साफ असून त्यांना गरीबांकडून पैसे लुटायचे आहेत. आम्ही आधीही सांगितलं होतं की निवडणुकानंतर पेट्रोल-डिझेलचे भाव नक्कीच वाढणार आहेत.


किंमती पुन्हा कमी करा - अधीर रंजन


काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी यावेळी म्हणाले, ''आम्ही आधीच भविष्यवाणी केली होती, की पाच राज्यांतील निवडणुकानंतर पेट्रोल-डिझेलचे भाव वाढतील. पण हे वाढलेले भाव कमी करावे अशी आमची मागणी आहे. या वाढलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमुळे सामान्य जनतेला मोठी अडचण होत आहे. पण सरकारला या अडचणी दिसत नाहीत.''


हे ही वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha