Rahul Gandhi Disqualified News : खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करत आपली बाजू मांडली असून लढण्याची तयारी दर्शवली आहे. भारतासाठी लढत आहे, त्यासाठी कोणताही किंमत चुकवण्यास तयार असल्याचे राहुल गांधी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांची खासदारी रद्द झाल्यानंतर देशभरात काँग्रेस नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनास सुरुवात केली आहे. तसेच इतर विरोधीपक्षातील नेत्यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे.
"मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं।" असे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. राहुल गांधी यांच्या ट्वीटला अल्पावधीतच लोकांकडून रिस्पॉन्स दिला जात आहे. अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहेत. देशातील सर्व जनता तुमच्यासोबत आहे... असे एका युजर्सने म्हटले तर अन्य एका काँग्रेस समर्थक युजर्सने म्हटले की, हिटलरशाहीच्या विरोधातील लढ्यात आम्ही तुमच्यासोबत आहोत.
पाहा राहुल गांधींचे ट्वीट -
डरो मत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर बदलला फोटो -
न्यायालयाचा निर्णय येताच एकीकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली, तर दुसरीकडे काँग्रेसने (Congress) आपल्या अधिकृत सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो (Profile Photo) बदलला. त्यानंतर सर्व काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनीही आपले प्रोफाईल फोटो बदलण्यास सुरुवात केली. काँग्रेसने ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट यांसारख्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन प्रोफाईल फोटो अपलोड केला आहे. हा ब्लॅक अॅण्ड व्हाईट फोटो राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेदरम्यानचा आहे, ज्यावर लिहिलं आहे की 'डरो मत'.
काय आहे प्रकरण?
राहुल गांधीनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान राहुल गांधींनी मोदी आडनावावरुन टीका केली होती. राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यानंतर काल (23 मार्च) त्यासंदर्भात सूरतच्या जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान राहुल गांधींना दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर त्यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. राहुल गांधींनी जामीनासाठी अर्ज केला. राहुल गांधीचा जामीन मंजूर झाला आहे. मात्र या शिक्षेची अंमलबजावणी 30 दिवसांसाठी स्थगित करण्यात आली. तसंच उच्च न्यायालयात जाण्यासाठी कोर्टाने राहुल गांधींना 30 दिवसांचा वेळ दिला आहे.
आणखी वाचा :
लिली थॉमस प्रकरण काय आहे, ज्यामुळे राहुल गांधींची खासदारकी गेली? आता पुढे पर्याय काय?