Rahul Gandhi Reached to Meet Wrestlers in Haryana: भारतीय कुस्ती संघटनेचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात पुन्हा एकदा कुस्तीपटू आक्रमक झाले आहेत. कुस्तीपटू साक्षी मलिकनं (Sakshi Malik) कुस्ती सोडण्याचा निर्णय घेत देशाला धक्का दिला. तर साक्षीपाठोपाठ बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि विनेश फोगाटनं (Vinesh Phogat) आपापले पुरस्कार परत करणार असल्याची घोषणा केली. भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिला कुस्तीपटू सातत्यानं करत आहेत. लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्यांवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. 






ब्रिजभूषण यांचे निकटवर्तीय संजय सिंह बबलू यांची फेडरेशनचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली, तेव्हा साक्षी मलिक यांनी निषेधार्थ कुस्ती सोडण्याचा निर्णय घेतला, तर बजरंग पुनियानं पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर पद्मश्री सोडण्याचा निर्णय घेतला आणि विनेश फोगटनं त्यांचा अर्जुन पुरस्कार आणि मेजर ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. या सर्व घडामोडी घडत असतानाच, काँग्रेस नेते राहुल गांधी कुस्तीपटूंना भेटण्यासाठी हरियाणाचा कुस्तीपटू दीपक पुनियाच्या गावी पोहोचले आहेत.


राहुल गांधी यांनी छारा गावात पोहोचून वीरेंद्र आखाड्यात पैलवानांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत बजरंग पुनियाही उपस्थित होते. छारा गाव हे कुस्तीपटू बजरंग पुनियाचं गाव आहे, जे झज्जर जिल्ह्यात येतं. दीपक आणि बजरंग पुनिया यांनी या वीरेंद्र आखाड्यातून कुस्तीला सुरुवात केली होती.


यादरम्यान राहुल गांधी कुस्तीपटूंच्या आखाड्यात पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या कसरती, त्यांच्या कारकिर्दीत येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधींसोबत यावेळी बजरंग पुनिया देखील त्याच्यासोबत दिसला. सध्या कुस्तीपटू कुस्ती संघटनेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच बजरंग पुनियानं पद्मश्री पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्याच्या गावात जाऊन त्याची भेट घेतल्यामुळे यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


विनेश फोगाट मेजर ध्यानचंद खेलरत्न अन् अर्जुन पुरस्कार परत करणार; पंतप्रधानांना लिहिलं पत्र