दिल्ली : देशाच्या शत्रूंनी या देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले. मात्र त्यांना त्यात यश आले नाहीत. देशातील शत्रूंना देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करणे अशक्य झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते काम करून दाखवले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. लहान दुकानदारांचा आवाज दाबण्याच प्रयत्न करतात म्हणजे तुम्ही देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. भारमातेच्या आवाजाला, विद्यार्थ्यांना, माध्यमांना, न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न कराल, तर देश तुम्हाला याचे जबरदस्त उत्तर देणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.


सीएए आणि एनआरसी विरोधात काँग्रेसचं देशव्यापी आंदोलन सुरु राहणार आहे. दिल्लीतील राजघाटावर आज सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी धरणे आंदोलन केलं. या प्रसंगी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि राहुल गांधी यांनी घटनेची प्रस्तावना वाचून दाखवली.

राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी जेव्हा तुम्ही न्यायव्यवस्थेवर दबाव टाकता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांवर लाठीमार, गोळीबार घडवता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज शांत करण्याच प्रयत्न करतात, जेव्हा तुम्ही माध्यमांना धमकावतात त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही देशाचा आवाज शांत करण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा तुम्ही भारतातील कोट्यावधी तरुणांचा रोजगार हिसकावून घेता, नोटाबंदी करता, देशातील उद्योजकांना, लहान दुकानदारांचा आवाज दाबण्याच प्रयत्न करतात म्हणजे तुम्ही देशाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे.

जिथपर्यंत कपड्यांचा प्रश्न येतो मोदीजी, संपूर्ण देश तुम्हाला तुमच्या कपड्यांवरून ओळखतो. दोन कोटींचा सुट भारतातील जनतेने नाहीतर तुम्ही घातला होता. हा देश एक आहे. तुम्ही देशाला उत्तर द्या, कोट्यावधी विद्यार्थ्यांना उत्तर द्या, तुम्ही देशाच्या अर्थव्यवस्थेला, रोजागाराला काय केले? का हे नष्ट केले? देशाचा विकासदर तुम्ही खालवला आहे. तरुणांना रोजगार न मिळण्याचे कारण तुम्ही सांगायला हवे. तुम्ही रोजगार देऊ शकला नाहीत, अर्थव्यवस्थेला चालवू शकला नाहीत. त्यामुळेच तुम्ही द्वेषामागे लपत आहात. त्यामुळेच तुम्ही देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केला.