नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधींच्या ट्वीटची सर्वत्र चर्चा आहे. त्यामुळे अवस्थ झालेल्या विरोधकांनी राहुल गांधीना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मात्र राहुल गांधींनी विरोधकांना सणसणीत उत्तर देत, सर्वांचीच बोलती बंद केली आहे. राहुल गांधींनी ट्विटरवरुन स्वत: च्या पाळीव कुत्र्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. आणि हाच आपलं ट्विटर हँडल करत असल्याचं म्हटलंय. त्यामुळे विरोधकांना त्यांच्याच भाषेत राहुल गांधींनी सडेतोड उत्तर दिलं आहे. राहुल गांधींनी शेअर केलेल्या व्हिडीओत ते एका कुत्र्याच्या पिलासोबत दिसत आहेत. व्हिडीओत कुत्रा तेच करत आहे. जे राहुल गांधी सांगत आहेत. या व्हिडीओत राहुल गांधींनी सर्वात आधी कुत्र्याला ‘नमस्ते’ करण्याची सूचना केली. यानंतर एका ट्रिकने बिस्किट त्याच्या नाकावर ठेऊन त्याला खायला लावलं. व्हिडीओ सोबत राहुल गांधींनी म्हटलंय की, "या व्यक्तीसाठी (राहुलसाठी) कोण ट्वीट करत आहे. हा मी आहे. पीडी जो यांच्याशी (राहुलसोबत) अतिशय कुल आहे. पाहा मी एका ट्वीट... नाही... ट्रीटच्या माध्यमातून काय केलं आहे ते?"