राहुल गांधी कोकेनची नशा करतात - सुब्रमण्यम स्वामी
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2018 09:07 AM (IST)
“राहुल गांधी हे कोकेनची नशा करतात, जर त्यांची डोपिंग चाचणी घेतली तर ते त्यात नक्कीच दोषी ठरतील” अशी टीका स्वामी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केली.
नवी दिल्ली : भाजपाचे नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांनी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लक्ष केले आहे. “राहुल गांधी हे कोकेनची नशा करतात, त्यांनी डोपिंग चाचणी घेतल्यास ते दोषी आढळतील असं स्वामी म्हणाले. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांची डोपिंग चाचणी करण्याचा निर्णय पंजाब सरकारने घेतलायं. यावर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरच प्रतिक्रिया देताना सुब्रमण्यम स्वामींनी राहुल गांधींवर थेट आरोप केले आहेत. “राहुल गांधी हे कोकेनची नशा करतात, जर त्यांची डोपिंग चाचणी घेतली तर ते त्यात नक्कीच दोषी ठरतील” अशी टीका स्वामी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना केली. यात त्यांनी स्वामींनी हरसिमरत कौर यांच्या वक्तव्याचे स्वागत करत राहुल गांधीची डोपिंग चाचणी घेतल्यास ते दोषी आढळतील. कारण ते विशेषत: कोकेनचे सेवन करत असल्याचे स्वामींनी म्हटले आहे. केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी 70 टक्के पंजाबींना नशेडी म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांवर टीका केली होती. यांची टीकेला धार देत स्वामी यांनी राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पोलिसांना नियुक्तीआधी डोपिंग टेस्ट करण्याचा आदेश दिलायं. यासंबंधीचे सर्व आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले आहे.