Rahulg Gandhi on Maharashtra Election : लोकसभा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार (Rahulg Gandhi on Maharashtra Election) केल्याचा आरोप करत निवडणूक चोरल्याचा हल्लाबोल केला आहे. राहुला गांधी यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये पानभर लेखामध्ये पाच 5 स्टेपमध्ये या षड्यंत्राचा आराखडा मांडला आहे. यामध्ये एकतर्फी निवडणूक आयुक्तांची निवड, बनावट मतदार, बनावट मतदान, टार्गेट बुथ रिगिंग आणि CCTV/पुरावे लपवण्याचे सांगितलं आहे. यामध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मतदानानंतर अचानक 7.83 टक्के मतदान टक्केवारी वाढणे ही इतिहासातील अभूतपूर्व घटना असल्याचे म्हटले आहे. त्यांनी या सर्व घडामोडींना “Match-fixing” असल्याचे म्हटले आहे. जिथं निकाल आधीच ठरवले होते. शेवटी, ते म्हणतात की "मॅच फिक्स झालेली निवडणूक ही लोकशाहीसाठी विष आहे." 

Continues below advertisement


संपूर्ण लोकशाही संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न


राहुल गांधी यांनी नोव्हेंबर 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप केला आहे. ते म्हणतात की ही  फक्त लहान प्रमाणात फसवणूक नाही, तर संपूर्ण लोकशाही संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे.






निवडणूक आयुक्तांची नियुक्ती एकतर्फी


राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्या मुद्यात म्हटलं आहे की, 2023 मध्ये झालेल्या कायद्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्री 2:1 बहुमताने निवडणूक आयुक्त नियुक्त करतात. त्यामुळे या निवड प्रक्रियेत विरोधी पक्षनेत्याच्या मताला फारसे महत्त्व नाही. न्यायाधीशांचाही निर्णय केंद्र सरकारच ठरवतं याकडेही त्यांनी लक्ष वेधलं आहे. 


मतदार यादीत बनावट नावे


दुसऱ्या मुद्यामध्ये महाराष्ट्रात मतदारयादीत बोगस नावे घुसडल्याचा आरोप केला आहे. यामध्ये आकडेवारी सादर करताना राहुल यांनी मे 2024 मध्ये महाराष्ट्रातील मतदारसंख्या होती 9.29 कोटी होती. मात्र, नोव्हेंबर 2024 मध्ये ती अचानक 9.70 कोटींवर पोहोचली आणि फक्त 6 महिन्यांत 41 लाखांची वाढ झाल्याचे म्हटले आहे. यातील फक्त 15 लाख मतदारांनी मतदान केले, उर्वरित संशयास्पद असल्याचे म्हटले आहे. 


बनावट मतदानाने टक्केवारी वाढवणे


राहुल यांनी मतदानाच्या दिवशी 5 वाजता 58.22% मतदान झाले होते असे म्हटले आहे. यामध्ये अंतिम आकडेवारीत ते 66.05% वर गेले. म्हणजे 7.83% अचानक वाढ झाल्याचे सांग त्यांनी सुमारे 76 लाख बनावट मतं घातली गेली असावीत, असा गंभीर आरोप केला आहे.  


बोगस मतदानांचे ‘पिनपॉइंट’ टार्गेट


राहुल गांधी यांनी पुढे म्हटले आहे की, 85 विधानसभा क्षेत्रांमध्ये लक्ष्य करून बनावट मतदान झाले. भाजपला अनेक ठिकाणी अवास्तव मतं मिळाली. कम्भ मतदारसंघात 134,000 मतांपैकी भाजपला 119,000 मतं मिळाली. ही 89 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पारनेरमध्ये 1.75 लाख मतदार आणि भाजपला 1.75 लाख मते मिळाल्याचे म्हटले आहे. 


पुरावे लपवणे


निवडणूक आयोगाने विरोधकांच्या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचेही राहुल यांनी म्हटले आहे. CCTV आणि EVM फूटेज देण्यास नकार दिला. सरकारने 1961 निवडणूक नियमात बदल करून CCTV डेटा सार्वजनिक होऊ नये असे केले.  EPIC कार्डवर एकसारखे क्रमांक दिसले, म्हणजे डुप्लिकेट मतदार असल्याचा गंभीर आरोप राहुल यांनी केला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या