रायपूर : नोटबंदी करुन या मोदी सरकारनं तुम्हाला रांगेत उभं केलं. नोटाबंदीदरम्यान सर्वसामान्यांनी लांबच लांब रांगांमध्ये थांबण्याचे कष्ट घेतले. मात्र, काळा पैसा असणाऱ्यांना या रांगेमध्ये पाहिले नाही. नीरव मोदी, विजय मल्ल्या, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी हे आपले पैसे घेऊन देशातूनच फरार झाले, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
छत्तीसगड विधानसभेसाठीच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात झाली. नक्षलग्रस्त भागाचा आढावा घेत ते येथे प्रचार सभा घेत आहेत. एका सभेत बोलताना त्यांनी नोटाबंदीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. रमण सिंग यांनी मित्रांना वाचवण्यासाठी छत्तीसगडमध्ये चिटफंड घोटाळा केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
छत्तीसगढमध्ये 12 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. आज राहुल गांधी यांनी प्रचारसभेच्या आधी रोड शो देखील केला.
नोटाबंदीमुळे सर्वसामान्य रांगांत तर काळा पैसावाले फरार, राहुल गांधींची मोदींवर टीका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Nov 2018 06:32 PM (IST)
छत्तीसगड विधानसभेसाठीच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात झाली. नक्षलग्रस्त भागाचा आढावा घेत ते प्रचार सभा घेत आहेत. एका सभेत बोलताना त्यांनी नोटाबंदीवरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -