भोपाळ : मध्य प्रदेशचे वित्त मंत्री जयंत मलैया दमोह विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात मनोज देवलिया या सामान्य नागरिकाने निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला. परंतु अर्ज दाखल करताना देवलिया यांनी डिपॉझीट म्हणून जमा करण्यासाठी 10 हजार रुपयांची चिल्लर सोबत आणली होती. त्यामुळे देवलिया सध्या चर्चेत आहेत. देवालिया यांनी चिल्लर भरून गाठोडे आणलेले पाहून जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अचंबित झाले.


निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन गोंधळ घालणारा नारायण वाघ (मकरंद अनासपूरे) आपण 'गल्लीत गोंधळ दिल्ली मुजरा' या चित्रपटात पाहिलाच आहे. परंतु चित्रपटातील हा प्रसंग आहे असा मध्य प्रदेश मध्ये घडला आहे. मनोज देवलिया नामक एका नागिकाने निवडणुकीचा अर्ज दाखल करताना 10 रुपयांची चिल्लर जमा केली.

चौकशी आणि तपासनीनंतरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुरक्षारक्षकांनी चिल्लर भरून आणलेले गाठोडे कार्यालयात नेण्याची परवानगी दिली. देवलिया यांनी जमा केलेल्या चिल्लरची मोजणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना एक तास द्यावा लागला.