बस्तर : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान आणि मिझोरममध्ये प्रचार सभा तापत आहेत. आज छत्तीसगडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. नक्षलवादाबाबत काँग्रेसनं नेहमीच दुतोंडी भूमिका घेतल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
एकीकडे शहरी नक्षलवादाचं समर्थन करायचं आणि दुसरीकडे छत्तीसगडच्या नक्षली भागात आल्यावर नक्षलवादावर कारवाई करण्याच्या बाता करायच्या. ही काँग्रेसची दुतोंडी भूमिका असल्याचं मोदींनी म्हटलं आहे. पत्रकाराची हत्या करणाऱ्या नक्षलींनाही काँग्रेस क्रांतीकारी ठरवतंय हे दुर्दैवी आहे, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे.
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त बस्तर भागात प्रचार सभेत पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच थेट शहरी नक्षलवादावर भाष्य केले आहे. शहरी नक्षलवादी हे एसी खोलीत बसतात, त्यांची मुलं परदेशात शिक्षण घेतात. पण ते रिमोट कंट्रोलद्वारे आदिवासी भागातील तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत आणि अशा शहरी नक्षलवाद्यांना काँग्रेस का पाठिंबा देत आहे, पत्रकाराची हत्या करणाऱ्या नक्षलवाद्यांना काँग्रेस नेते क्रांतिकारी म्हणतात, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. भाजपा हा कोण्याच्या कृपादृष्टीवर चालणारा पक्ष नाही, देशातील सव्वाशे कोटी जनताच भाजपासाठी हायकमांड आहे, असेही ते म्हणाले.
मोदी म्हणाले की, ज्या मुलांच्या हातात पेन- पेन्सिल असायला हवी अशा मुलांच्या हातात काही राक्षसी वृत्तीचे लोक शस्त्रं देतात. त्यांच्या आई- वडिलांचे स्वप्न उद्ध्वस्त करतात. जे शहरी नक्षलवादी आहेत, त्यांची मुले परदेशात शिक्षण घेतात, स्वत:देखील चांगले आयुष्य जगतात, एसी खोलीत बसतात. पण रिमोट कंट्रोलद्वारे ते आदिवासी तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
दूरदर्शनचा पत्रकार कॅमेरा घेऊन आला होता. या पत्रकाराची नक्षलींनी हत्या केली, अशा नक्षलींना काँग्रेस नेते क्रांतिकारी म्हणतात, ही कोणती विचारधारा आहे, असा सवाल त्यांनी काँग्रेसला विचारला.
नक्षलवादाबाबत काँग्रेसची दुतोंडी भूमिका, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Nov 2018 04:56 PM (IST)
एकीकडे शहरी नक्षलवादाचं समर्थन करायचं आणि दुसरीकडे छत्तीसगडच्या नक्षली भागात आल्यावर नक्षलवादावर कारवाई करण्याच्या बाता करायच्या. ही काँग्रेसची दुतोंडी भूमिका असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -