Priyanka Gandhi Vadra : सुरतमधील न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभा सचिवालयाकडून रद्द करण्यात आली. यानंतर आता देशभरात काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्ते संतापले आहेत. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर प्रियांका गांधी यांनी पीएम मोदींवर कडाडून प्रहार केला आहे.  तुमच्यासारख्या भ्याड, सत्तेच्या भुकेल्या हुकूमशहापुढे कधीही झुकलो नाही आणि झुकणारही नाही. तुम्हाला जे पाहिजे ते करा, अशा शब्दात त्यांनी ठणकावले आहे. त्यांनी पाठोपाठ चार ट्विट करून भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेचाही त्यांनी समाचार घेत मोदींचे चमचे असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे.  


काय म्हणाल्या प्रियांका गांधी?


प्रियांक यांनी ट्वीट करून म्हटले आहे की, मोदीजी, तुमच्या चमच्यांनी शहीद पंतप्रधानांच्या मुलाला देशद्रोही मीर जाफर म्हटले. तुमच्या एका मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला की राहुल गांधींचे वडील कोण? काश्मिरी पंडितांच्या प्रथेनुसार, एक मुलगा आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर पगडी घालतो, आपल्या कुटुंबाची परंपरा राखतो. संपूर्ण कुटुंबाचा आणि काश्मिरी पंडित समाजाचा अपमान करत तुम्ही पूर्ण संसदेत नेहरूंचे नाव का ठेवत नाही, असा सवाल केला, पण कोणत्याही न्यायाधीशाने तुम्हाला दोन वर्षांची शिक्षा दिली नाही. तुम्हाला संसदेतून अपात्र ठरवले नाही. राहुलजी यांनी खऱ्या देशभक्ताप्रमाणे अदानींच्या लुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.  






त्या पुढे म्हणतात, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीवर प्रश्न उपस्थित केले. तुमचा मित्र गौतम अदानी देशाच्या संसदेपेक्षा आणि भारतातील महान लोकांपेक्षा मोठा झाला आहे की त्याच्या लुटीचा प्रश्न विचारल्यावर तुम्हाला धक्का बसला होता? तुम्ही माझ्या कुटुंबाला परिवारवादी म्हणता, जाणून घ्या, या कुटुंबाने आपल्या रक्ताने भारतातील लोकशाहीचे सिंचन केले. जे तुम्ही संपवण्याचा प्रयत्न करत आहात. या कुटुंबाने भारतातील लोकांचा आवाज उठवला आणि पिढ्यांनी सत्यासाठी लढा दिला. आमच्या नसात धावणाऱ्या रक्ताची एक खासियत आहे. तुमच्यासारख्या भ्याड, सत्तेच्या भुकेल्या हुकूमशहापुढे कधीही झुकणार नाही आणि झुकणार नाही. तुम्हाला जे पाहिजे ते करा.


त्या अन्य एका ट्विटमध्ये म्हणतात..


भाजप भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालते का?
नीरव मोदी घोटाळा - 14,000 कोटी
ललित मोदी घोटाळा - 425 कोटी
मेहुल चोक्सी घोटाळा - 13,500 कोटी
देशाचा पैसा लुटणाऱ्यांच्या मदतीला भाजप का उतरला आहे? ती चौकशीपासून का पळत आहे? यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात.


इतर महत्वाच्या बातम्या