नवी दिल्ली : सीबीआयमधील अंतर्गत वादाला कथित राफेल घोटाळ्याशी जोडून काँग्रेसने आज देशव्यापी आंदोलन केलं. दिल्लीत सीबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अशोक गहलोत, प्रमोद तिवारी यांच्यासह इतर नेत्यांनी स्वत:ची प्रतिकात्मक अटक करुन घेतली. यानंतर राहुल गांधी आणि इतर नेत्यांना लोधी रोज पोलिस स्टेशनमध्ये नेलं. राहुल गांधींच्या नेतृत्त्वा दयाल सिंह कॉलेजपासून सुरु झालेला काँग्रेसचा मोर्चा सीबीआय मुख्यालयापर्यंत संपला. यानंतर तिथे काँग्रेसने घोषणाबाजी करत निदर्शनं केली.

आलोक वर्मा यांची नि. न्यायमूर्तींमार्फत दोन आठवड्यात चौकशी होणार

'काँग्रेस चौकीदाराला चोरी करु देणार नाही'
सीबीआय संचालक आलोक वर्मा यांचे अधिकार काढल्याच्या विरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात आंदोलन करण्यात आलं. राफेल डीलच्या चौकशीपासून सरकारने ही कारवाई केल्याचा आरोप राहुल गांधी यावेळी मोदी सरकारवर केला. काँग्रेस चौकीदाराला चोरी करु देणार नाही. काँग्रेस अध्यक्ष ने कहा, 'भारतातील प्रत्येक संस्थेत पंतप्रधान मोदी हस्तक्षेप करत आहेत. नरेंद्र मोदींनी अनिल अंबानी यांच्या खिशात पैसा घातला आहे.' सीबीआय संचालक आलोक वर्मांना त्यांचे अधिकार पुन्हा बहाल करुन पंतप्रधानांनी या मुद्द्यावर माफी मागावी, अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे.

सीबीआय महासंचालकांची नियुक्ती कशी होते?

देशभरात काँग्रेसची आंदोलनं
दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या नेतृत्त्वात सीबीआय मुख्यलयाबाहेर काँग्रेसने निदर्शनं केली. तर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणासह अनेक राज्यात सीबीआय कार्यालयाबाहेर निदर्शनं केली. काँग्रेसच्या या निदर्शनांना इतर विरोधी पक्षांचीही साथ मिळाली. काँग्रेससह टीएमसी आणि सीपीआय नेतेही आंदोलनात सहभागी झाले.

सीबीआयमधील वादाचा नेमका मोदींशी संबंध कसा?

राजनाथ सिंहांचा पलटवार
काँग्रेसच्या आंदोलनावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पलटवार केला आहे. काँग्रेसकडे जनतेच्या हिताचा कोणताही मुद्दा शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे ते देशाची दिशाभूल करत आहेत. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, समिती तपास करत आहे. अहवालाची प्रतीक्षा करायला हवी, असं राजनाथ सिंह म्हणाले.

संबंधित बातम्या

CBI वादावर सरकारने हात झटकले, CVCच्या सल्ल्याने SIT तपास करणार

सीबीआयमधील अंतर्गत वादाचं मूळ असलेला मोईन कुरेशी कोण आहे?