मुंबई : लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election 2024) राहुल गांधी (Rahul Gandhi) त्यांची भारत न्याय यात्रा सुरु करणार आहेत. 14 जानेवारीपासून राहुल गांधींच्या या यात्रेला सुरुवात होईल. तसेच राहुल गांधींच्या या यात्रेचं नावं देखील बदलण्यात आलं असून या आता या यात्रेचं नाव भारत जोडो न्याय यात्रा होणार आहे. याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी दिलीये. 






या यात्रेची सुरुवात मणिपूरपासून होणार असून मुंबईत शेवट होईल. 14 जानेवारी रोजी दुपारी 12 नंतर या यात्रेला राहुल गांधी सुरुवात करतील. या यात्रेला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच राहुल गांधी हे या यात्रेदरम्यान सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्यायविषयांवर आपले विचार लोकांसमोर मांडणार असल्याचं जयराम रमेश यांनी ट्विट करत म्हटलं आहे. 


110 जिल्ह्यांमधून करणार प्रवास


6,700 किलोमीटर लांबीचा हा प्रवास 15 राज्यांमधून जाणार आहे. या काळात राहुल गांधी बस आणि पायी प्रवास करणार आहेत. या यात्रेत इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांना देखील आमंत्रित करण्यात येईल. भारत जोडो न्याय यात्रेअंतर्गत राहुल गांधी 67 दिवसांत 6713 किमीचा प्रवास करणार असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांकडून देण्यात आलीये. ही यात्रा 15 राज्यांतील 110 जिल्ह्यांतून जाणार आहे. लोकसभेच्या 100 जागा या अंतर्गत येतील. राहुल गांधींच्या या यात्रेची मुंबईत होईल.


भारत जोडो न्याय यात्रेचा मार्ग



  • 107 किमीच्या प्रवासात मणिपूरमध्ये 4 जिल्हे समाविष्ट केले जातील.

  • नागालँडमध्ये ही यात्रा 257 किमी अंतर कव्हर करेल आणि 5 जिल्ह्यातून जाईल.

  • आसामच्या 833 किलोमीटरच्या प्रवासात ही यात्रा 17 जिल्ह्यांना भेट देईल.

  • अरुणाचल प्रदेशातील यामध्ये 1 जिल्हा समाविष्ट असून इथे ही यात्रा 55 किमीचा प्रवास करणार आहे.

  • मेघालयमध्ये देखील एकाच जिल्ह्यातून ही यात्रा जाणार आहे आणि राहुल गांधी इथे 5 किमीचा प्रवास करतील. 

  • पश्चिम बंगालमध्ये 523 किमीचा प्रवास असणार आहे. यावेळी ही यात्रा 7 जिल्ह्यांमधून प्रवास करेल. 

  • राहुल गांधी बिहारमध्ये 425 किलोमीटरचा प्रवास करतील आणि 7  जिल्हे कव्हर करतील.

  • यानंतर ही यात्रा झारखंडमध्ये जाईल आणि 804 किलोमीटरच्या प्रवासात 13 जिल्ह्यांमध्ये पोहोचेल.

  • हा प्रवास ओरिसामध्ये 341 किमी लांबीचा असेल आणि 4 जिल्ह्यातून जाईल.

  • छत्तीसगड 536 किमीमध्ये 7 जिल्ह्यांमधून प्रवास करेल. 

  • उत्तर प्रदेशमध्ये, राहुल गांधी 1,074 किमी प्रवास करतील आणि 20 जिल्ह्यातून जातील.

  • मध्य प्रदेशात 698 किमीचा प्रवास असेल आणि तो 9 जिल्ह्यांमधून करण्यात येईल. 

  • राजस्थानमध्ये, यात्रा 128 किमी अंतर कापेल आणि 2 जिल्ह्यातून जाईल.

  • 445 किमीचा मार्ग गुजरातमध्ये समाविष्ट केला जाईल आणि तो 7 जिल्ह्यांमधून जाईल.


हेही वाचा : 


Mahua Moitra : महुआ मोईत्रांना आणखी एक धक्का, SC पाठोपाठ दिल्ली उच्च न्यायालयानेही याचिका फेटाळली