Rahul Gandhi Twitter Bio: सुरतच्या न्यायालयाने राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मानहानीच्या एका खटल्यात दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर लगचेच राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. दरम्यान खासदारकी रद्द झाल्यावर राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलमध्ये (Twitter Bio) मोठा बदल केला आहे. राहुल गांधींनी ट्विटर (Twitter) प्रोफाईलवर अपात्र खासदार असा उल्लेख केला आहे.  खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी बदल केला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या ट्विटर प्रोफाईलच्या बायोमध्ये आता 'Dis’Qualified MP' असे पाहायला मिळत आहे. 


दरम्यान राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यावर काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. तर केंद्र सरकारच्या विरोधात आज राजघाटवर काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र पोलिसांनी या आंदोलनाची परवानगी नाकारली आहे. मात्र असे असलं तरीही काँग्रेसकडून आंदोलन होणारच असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द करण्यात आलेल्या निर्णयानंतर काँग्रेस केंद्र सरकारच्या विरोधात अधिकच आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. 


राज्यात देखील सत्याग्रह आंदोलन...


तर राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याविरोधात आज काँग्रेसने देशभरात सत्याग्रह आंदोलनाची हाक दिली असताना, राज्यात देखील अशाप्रकारे आंदोलन केले जाणार आहे.  मुंबई आणि नागपूरमधील आंदोलनात बडे नेते सहभागी होणार आहेत. तर राजघाटवरील काँग्रेसच्या सत्याग्रह आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली असल्याने यावर राज्यातील काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. तयर देशात हुकुमशाही पाहायला मिळत असल्याचा देखील आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. 


राहुल गांधींचा मोदींवर निशाणा...


खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. यावेळी राहुल गांधींनी काही मुद्दे उपस्थित करत विविध प्रश्न देखील विचारले आहेत. अदानी यांच्या शेल कंपनीत 20 हजार कोटी रुपये कोणी गुंतवले? असा थेट सवाल राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषेदतून उपस्थित केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अदानी यांचे संबंध कसे आहेत? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तर संसदेत अदानी आणि मोदींचा काय संबंध विचारल्यानंतर भाजपने माझ्याविरोधात ओरड सुरु केल्याचे राहुल गांधी म्हणाले. मोदी आणि अदानी यांचं नातं नवीन नसून, ते गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांचे संबंध असल्याचे राहुल गांधी म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Rahul Gandhi Press Conference Highlight : खासदारकी रद्द ते मोदी-अदानी संबंध, वाचा राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे