तसेच गुजरातचं सरकार रिमोट कंट्रोलनं चालतं आणि हा रिमोट दिल्लीतून ऑपरेट केला जातो, असा टोलाही राहुल गांधी यांनी यावेळी लगावला. दुसरीकडे पटेल समाजावर मोदी सरकारनं गोळीबार केला. पण काँग्रेसला सर्वांना एकत्र घेऊन पुढे जायचं आहे, असं म्हणत राहुल गांधींनी पाटीदार समाजाला साद घालण्याचा प्रयत्न केला.
सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी 'विकासाला काय झालं?' असा प्रश्न विचारला. त्यावेळी उपस्थित जनसमुदायाकडून 'विकास वेडा झाला आहे,' अशी प्रतिक्रिया आली. त्यावरुनच राहुल गांधींनी विकासाची खिल्ली उडवत मोदी सरकारवर निशाणा साधला.
काय म्हणाले राहुल गांधी?
दरम्यान, गेल्या 19 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजप सरकार सत्तारुढ आहे. जवळपास नरेंद्र मोदींनी राज्याची सूत्रं सांभाळल्यानंतर, आता देशाचं पंतप्रधान पद भूषवत आहेत. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळवून देण्याची त्यांची इच्छा आहे.
पंतप्रधान मोदींना यावेळी निवडणूक प्रचारात पटेल समाजाची नाराजीचा सामना करावा लागू शकतो. काही महिन्यांपूर्वी पटेल समाजाच्या आरक्षणाची मागणी करत हार्दिक पटेल राज्याचं राजकीय वातावरण चांगलंच ढवळून काढलं होतं.
सध्या हार्दिक पटेल यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या दौऱ्याचं स्वागत करत, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याचे संकेत दिले आहेत.