"एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है, तुमने देखा नहीं आँखों का समंदर होना." या मुन्नवर राणांच्या शायरीसोबत डोळ्यात आसू असलेल्या एका व्यक्तीचा फोटो राहुल गांधींनी आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.
नोटाबंदीनंतर बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात आसू आले होते. हाच फोटो त्यावेळी कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यानंतर आज राहुल गांधींनी मुन्नवर राणांची शायरी शेअर करत हा फोटो पुन्हा शेअर केला.
दरम्यान, याचबरोबर राहुल गांधींनी आणखी एक ट्विटही केलं आहे. 'पंतप्रधान मोदींनी कोणताही विचार न करता घेतलेल्या निर्णयामुळे कोट्यावधी इमानदार लोकांचं आयुष्य बरबाद झालं. त्या सर्व लोकांच्या आम्ही पाठिशी आहोत.'
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त विरोधक आज देशभरात काळा दिवस साजरा करणार आहेत. तसेच काँग्रेस आज रात्री 8 वाजता देशभरात कॅण्डल मार्च काढणार आहे.
संबंधित बातम्या :
नोटाबंदीचं एक वर्ष : देश किती कॅशलेस झाला?
नोटाबंदीची वर्षपूर्ती: नोटाबंदीवेळी मोदींनी केलेलं भाषण जसंच्या तसं!
सरकारचा 'काळे धन विरोधी दिन', तर विरोधकांचा 'काळा दिवस'
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपकडून तीन व्हिडीओ रिलीज
जयंत पाटलांनी मोदींना पाठवल्या खेळण्यातल्या नोटा!