नवी दिल्ली:  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरून पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. राफेल विमानाच्या या ‘चोरी’ मुळे फ्रांसचे सरकार देखील अडचणीत आले असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.


राहुल गांधी यांनी ट्वीट करत मोदींवर हल्ला चढवला आहे.  'आपल्या चौकीदाराच्या चोरीने फ्रांस सरकार अडचणीत आले आहे. राफेल विमानाच्या सौद्याची चौकशी व्हावी अशी मागणी फ्रान्सची जनता करू लागली आहे, असे सांगत आता केवळ गल्लीतच नव्हे तर जगभरात देखील हिंदुस्थानचा चौकीदारच चोर आहे हे कळू लागलेय असे राहुल यांनी म्हटले आहे.

राहुल गांधींनी एका वृत्ताचा आधार घेत ही टीका केली आहे. या वृत्तामध्ये फ्रांसच्या एका एनजीओने राफेल मुद्द्यावरून तिथल्या लोक अभियोजक कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. या एनजीओने या प्रकरणातील तथ्याची गंभीरपणे चौकशी करून स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे. कोणत्या नियमाच्या आधारे भारत आणि फ्रान्समध्ये 36 राफेल विमानांचा सौदा होता? याची माहिती देखील एनजीओने मागविली आहे.

नुकतेच राहुल गांधी यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर जोरदार टीका करत मोदी यांनी कोणत्याही व्यासपीठावर राफेलबाबत माझ्याशी 15 मिनिटे चर्चा करण्यास तयार व्हावे, असे थेट आव्हान मोदींना दिले होते.

"मी नरेंद्र मोदी यांना आव्हान देतो, मोदींनी केवळ 15 मिनिटे राफेल विषयावर माझ्याशी चर्चा करावी. मी अनिल अंबानी आणि फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी केलेल्या विधानांवर आणि राफेल विमानांवर बोलणार आहे. मोदींनी राफेल विमानांमध्ये घोटाळा केल्याचे सुरक्षा मंत्रालयाने स्पष्टपणे सांगितले होते. तसेच पंतप्रधानांनी कुठल्याही कायद्याचे पालन केलेले नाही. पंतप्रधान माझ्या कुठल्याच प्रश्नाचे उत्तर देणार नाहीत." असे राहुल म्हणाले होते.

राफेल विमान खरेदी करार

भारताकडून 2007 सालापासून फ्रान्सकडून अत्याधुनिक मिसाईल्स असणारे राफेल विमान खरेदी करण्याचे प्रयत्न केले जात होते. मात्र काही अडचणींमुळे या करारात अडथळा येत होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मागील वर्षीच्या फ्रान्स दौऱ्यानंतर या खरेदीला वेग आला आणि मोदींना भारत फ्रान्सकडून 36 फायटर जेट्स खरेदी करणार असल्याची घोषणा केली.

ग्राफिक्स व्हिडीओ | राफेल विमान नेमकं आहे तरी काय?

यूपीए सरकारच्या काळात फ्रान्सकडून 126 राफेल विमान खरेदीचा निर्णय झाला होता. यापैकी 36 विमान राफेल विमान बनवणारी कंपनी दसाल्ट एव्हिएशनकडून खरेदी करण्यात येणार होते. तर उर्वरित 90 विमानं भारतात तयार केले जाणार होते. मात्र पंतप्रधान मोदींनी जुना करार रद्द करत नव्याने खेरदीचा निर्णय घेतला.

मोदींनी करार केल्यानंतरही विमानांच्या किंमतींमुळे व्यवहार अडकून होता. फ्रान्सने भारताकडून 36 विमानांच्या मोबदल्यात 65 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही किंमत कमी करण्याची मागणी केली आणि त्यात त्यांना यशही मिळालं. 59 हजार कोटी रुपयांमध्ये हा करार झाला.

संबंधित बातम्या 

काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?  

राफेल डीलबाबत सरकारला हवाई दलाची साथ 

मोदी 'चोरांचे सरदार', राहुल गांधींचा पुन्हा हल्ला  

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष मोदींना चोर म्हणाले, राहुल गांधींचा आरोप  

काँग्रेस-भाजप वादात कळीचा मुद्दा ठरलेला राफेल करार काय आहे?   

राफेल विमान करार : भारताने फक्त रिलायन्सचं नाव सुचवलं : ओलांद   

गली गली में शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है : राहुल गांधी   

ग्राफिक्स व्हिडीओ | राफेल विमान नेमकं आहे तरी काय?