नवी दिल्ली : सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. तिथे काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. यावरुन आता देशात राजकारण देखील पेटलं आहे. भारताचे गृहमंत्री अमित शाह यांना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना शायराना अंदाजात उत्तर दिलं आहे. गालिबच्या सबको मालूम है जन्नत की हकीकत लेकीन.. या प्रसिद्ध शायरीवरुन प्रेरणा घेत राहुल गांधी यांनी, 'सब को मालूम है ‘सीमा’ की हक़ीक़त लेकिन,दिल के ख़ुश रखने को, ‘शाह-यद’ ये ख़्याल अच्छा है', असं ट्वीट त्यांनी केलं आहे.
काल साधारण साडे चार वाजता गृहमंत्री अमित शाह यांनी चीन बरोबर सुरु असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या संरक्षण धोरणाचे समर्थन करत एक वक्तव्य केलं होतं. भारताच्या संरक्षण धोरणाला जागतिक मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि इस्रायलनंतर आपल्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी कुठला देश सक्षम असेल तर, तो भारत आहे. संपूर्ण जगाने हे मान्य केले आहे, असं अमित शाह यांनी बिहारमधील डिजिटल सभेला संबोधित म्हटलं होता. अमित शाह यांचे हे वक्तव्य कोट करत राहुल गांधी यांनी शायरीच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
भारत-चीन सीमावादावर महत्वाची बैठक पूर्ण; चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
भारत-चीन सीमेवर दिवसेंदिवस तणाव वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर भारत चीनमध्ये सीमावादावर नुकतीच एक महत्वाची बैठक पार पडली. दोन्ही देशांच्या लष्करी कमांडर स्तरावरची ही सर्वोच्च चर्चा वाढलेल्या तणावाला शांत करु शकणार का हा प्रश्न आहे. पण, किमान दोन्ही देशांमध्ये चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न होतोय ही बाब यातून अधोरेखित झालीय. लडाखच्या सीमेवर दोन्ही बाजूंमध्ये ले. जनरल स्तरावर ही बातचीत झाली. गेल्या 32 दिवसांपासून सुरु असलेल्या सीमावादावर काय तोडगा निघतो याकडे दोन्ही देशातील नागरिकांचे लक्ष आहे.
चिनी वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग, बहिष्काराची मोहीम अपयशी ठरेल; चीनने भारताला खिजवलं
भारत आणि चीनमध्ये लष्करी प्रोटोकॉलनुसार फील्ड स्तरावरची सर्वोच्च बैठक पार पडली. गेल्या महिनाभरापासून चीन सीमेवर वाढलेल्या तणावाचा प्रश्न संवादानं मिटवण्याचा प्रयत्न दोन्ही देशांकडून झाला. भारताकडून ले जनरल हरिंदर सिंह यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.
भारत चीनमध्ये तणाव का वाढला
- 5 मे रोजी लडाखमध्ये भारत आणि चीनी सैन्यांमध्ये झडप
- लडाखमधल्या गैलवान पर्वताजवळच्या प्रदेशात सैन्याच्या जमवाजमवीवरुन हा वाद सुरु झाला. त्याची झळ नंतर लडाखच्या पँगाँग तलावापर्यंत पोहचली.
- या तलावाच्या आसपास असलेल्या डोंगररांगामध्ये दोन्ही देशांचे फिंगर एरिया ठरलेले आहेत. पण एकमेकांच्या फिंगर एरियात अतिक्रमण केल्यानं वाद पेटला.
- भारत-चीनचे 250 जवान एकमेकांसमोर उभे ठाकले, दगडफेक आणि मारामारीत काही जण जखमीही झाले.