Rahul Bajaj Death : प्रमुख उद्योगपती आणि बजाज ग्रुपचे माजी चेअरमन राहुल बजाज यांचं शनिवारी निधन झालं. ते 83 वर्षाचे होते. मागील दोन महिन्यापासून आजारी असल्यामुळे राहुल बजाज यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरु होते. वाढते वय आणि हृदयाचा आणि फुफ्फुसांच्या आजारामुळे उपचार करण्यास डॉक्टरांना मर्यादा येत होत्या. अखेर शनिवारी दुपारी अडीच वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राहुल बजाज यांनी वाहन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जवळपास पाच दशकांपर्यंत राहुल बजाज यांनी बजाज ग्रुपचे चेअरमनपद यशस्वीपणे सांभाळले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. वाहन क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेत 2001 मध्ये भारत सरकारने राहुल बजाज यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केलं. विदेशी कंपन्यांच्या स्पर्धेला आव्हान देत 'बजाज ऑटो' (Bajaj) कंपनीला त्यांनी भारतातच नाही तर जगभरात पोहोचवलं.
जन्म -
10 जून 1938 रोजी कोलकाता येथील एका मारवाडी कुटुंबात राहुल बजाज यांचा जन्म झाला. घरात व्यावसायिक पार्श्वभूमी असल्यामुळे राहुल बजाज यांनीही उद्योगक्षेत्रात काम सुरु केलं. अल्पवधीत राहुल बजाज यांनी आपला ठसा उमटवला.
शिक्षण -
राहुल बजाज यांचे शालेय शिक्षण मुंबईतील प्रतिष्ठित कॅथेड्रल आणि जॉन कॉनॉन या शाळामधून झाले. बजाज यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन महाविद्यालयातून इकॉनॉमिक्स विषय घेऊन बी.ए (ऑनर्स ) ही पदवी मिळवली. मुंबईत परतल्यावर, दोन वर्ष सकाळी सरकारी विधी महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास केला. 1964 साली त्यांनी हार्वर्ड विद्यापीठाची व्यवस्थापन क्षेत्रातील (एम.बी.ए.) पदवी प्राप्त केली.
विवाह -
1961 साली रुपा घोलप या महाराष्ट्रीय तरुणीसोबत राहुल बजाज यांचा विवाह झाला. राजीव, संजीव आणि सुनयना अशी तीन मुलं त्यांना आहेत. राहुल बजाज यांचे पुत्र राजीव बजाज आणि संजीव बजाज कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये प्रवेश केला.
राहुल बजाज हे 1965 साली बजाज ग्रुपचे चेअरमन झाले.
1972 मध्ये 'बजाज ऑटो'ची सूत्रे हाती घेतली.
2005 साली ते चेअरमन पदावरून पायउतार झाले. त्याचे पुत्र राजीव हे बजाज ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक झाले.
राहुल बजाज हे 2006 ते 2010 या दरम्यान राज्यसभेचे सदस्य म्हणून होते.
2016 च्या फोर्ब्ज मासिकात जगातील श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये राहुल बजाज 722 व्या क्रमांकावर होते.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI