नवी दिल्ली : भारतासोबत राफेल विक्रीचा करार करण्यासाठी डसॉल्ट कंपनीने मध्यस्थाला 65 कोटींची लाच दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मीडियापार्ट' या फ्रेंच पोर्टलने  ही माहिती समोर आणली आहे. यासोबतच लाचखोरीच्या पुराव्याची कागदपत्रं असतानाही सीबीआय आणि ईडीनं याचा तपास केला नसल्याचा आरोपही 'मीडियापार्ट'ने केला आहे. त्यामुळे याप्रकरणाला आता नवं वळण मिळालं आहे. राफेल करारात मध्यस्थाने 65 कोटींची लाच घेतल्याचं समोर आल्यानंतर भाजपनं काँग्रेसवर हल्लाबोल केलाय. 


कॉंग्रेस प्रवक्ता पवन खेडा म्हणाले, राफेल घोटाळा 60  ते 80 कोटी रुपये कमिशनचा नसून तर हा सर्वात मोठा रक्षा घोटाळा आहे. या साठी सर्वात मोठ्या घोटाळ्याची चौकशी झाली पाहिजे. 26 मार्च 2019 ला ईडीने केलेल्या छापेमारीत रक्षा मंत्रालयाचे अनेक गोपनीय दस्ताऐवज जप्त केले. राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालणे, देशद्रोह आणि ऑफिशिअल अॅक्टचे उल्लंघन आहे.


कॉंग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. तर राहुल गांधी यांनी लिहिले की, सत्याची साथ असेल तर चिंता करण्याची गरज नाही. राहुल गांधीनी कार्यकर्त्यांना आवाहान केले आहे की, भ्रष्टाचारी केंद्र सरकार विरोधात आपली लढाई सुरूच आहे. 


Rafale Deal : राफेल विमान खरेदी प्रकरणात नवा खुलासा, सुशेन गुप्ता या मध्यस्ताला 7.5 मिलियन युरो दिल्याचा दावा


तर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, 2007 ते 2012 या साला दरम्यान दसॉ एव्हिएशनला ६५ कोटी रुपये दिले होते. या दरम्यान राफेल घोटाळा झाला आहे.  त्यावेळी कॉंग्रेसचे सरकार होते. राहुल गांधीनी इटलीवरून उत्तर दिले पाहिजे. कॉंग्रेसने भारतात कमिशनचे रेकॉर्ड तोडले आहे. 


संबित पात्रा यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर कमीशनखोरीचा आरोप लावला आहे. सांबित पात्रा पुढे म्हणाले, INC म्हणजे इंडियन नॅशनल कॉंग्रेसचे नाव बदलून I Need Commission केले पाहिजे. विना कमिशन हे कोणतेही काम करत नाही. राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका वाड्रा, रॉबर्ट वाड्रा सगळे कमिशन घेतात, जीप घोटाळा, बोफोर्स घोटाळा, टेट्रा ट्रक घोटाळा, अगस्ता वेस्टलॅंड घोटाळा म्हणजे जिथे घोटाळा तिथे कॉंग्रेस. कोण म्हणते भ्रष्टाचाराचा पत्ता माहित नाही. भ्रष्टाचाराचा पत्ता आहे 10 जनपथ. जेव्हापासून भाजप सरकार आले आहे तेव्हापासून भ्रष्टाचार बेघर झाला आहे.