'लढाऊ विमानं मिळण्यात उशिर ही चिंतेची बाब'
वायुसेनेच्या प्रमुखांनी स्क्वॉड्रनच्या घसरत्या संख्येवरही चिंता व्यक्त केली आहे. HAL सोबत करार केल्यानंतरही डिलिव्हरीमध्ये उशिर झाला. सुखोई-30 च्या डिलिव्हरीमध्ये तीन वर्षांचा उशिर, लढाऊ विमान जॅग्वारमध्ये सहा वर्षांचा उशिर झाला आहे. एलसीएमध्ये 5 वर्ष, मिराज 2000 च्या डिलिव्हरीमध्ये दोन वर्षांचा उशिर झाला आहे, धानाओ यांनी सांगितलं.
'राफेल विमान खरेदी करुन सरकारचं बोल्ड पाऊल'
राफेल डीलच्या प्रश्नावर बीएस धनोआ म्हणाले की, "आम्ही कठीण परिस्थितीत होतो. आमच्याकडे तीन पर्याय होते. पहिला पर्याय होता की काही कमी होण्याची वाट पाहणं, आरपीएफ काढणं, किंवा तातडीने खरेदी करणं. आम्ही तातडीने खरेदी केली. राफेल डील आमच्यासाठी बूस्टर डोससारखी आहे."
"सरकारने हे बोल्ड पाऊल उचलत 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली. उच्च कामगिरी करणारं आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुज्ज लढाऊ विमान भारतीय हवाई दलाला दिलं आहे. जेणेकरुन आम्ही आपली क्षमता वाढवू शकतो," असं धनोआ यांनी सांगितलं.