हैदराबाद : कोरोना संसर्गाशी दोन हात करण्यात वैद्यकीय कर्मचारी आणि पोलीस प्रशासन आघाडीवर काम करत आहेत. परिणामी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत पोलिसांमध्येही कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. यामध्ये देशात अनेक पोलिसांचा बळी या कोरोनाने घेतला आहे. दरम्यान, हैदराबादमधील रचकोंडा पोलीस आयुक्तालय मात्र याला अपवाद ठरला आहे. कारण, कोरोनाच्या विळख्यातून आपल्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन आजपर्यंत 100 टक्के यशस्वी झाले आहेत. याचं श्रेय जातं ते मराठमोळे अधिकारी आणि राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश मुरलीधर भागवत यांना.


आयुक्त महेश भागवत यांनी ही किमया कशी साधली हे त्यांच्याच शब्दात वाचा...


First responder म्हणून काम करत असताना डॉक्टरांसोबत पोलीस कर्मचारी पण तेव्हढेच vulnerable आहेत. पोलीस दलातील कोरोना पॉसिटीव्ह कर्मचार्यांची संख्या अनेक precaution घेऊनही दिवसेंदिवसववाढत जाते आहे. अत्यावश्यक सेवेमूळे पोलिसांना सक्तीने आपले कर्तव्य जोखीम घेत करावेच लागते आणि कोरोनाच्या काळात त्याला दुसरा पर्याय नाही. राचकोंडा पोलीस आयुक्तालय जे हैद्राबाद शहराच्या च्या पूर्व भागात आहे तेथे आजतागायत 500 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी ज्यात अतिरिक्त उप आयुक्त ते होमगार्ड यांचा समावेश आहे ते कोरोना पॉसिटीव्ह असल्याचे टेस्टनंतर निदर्शनास आले. पण अनुभवातून शिकत एक नियोजनबद्ध अश्या प्रणालीमुळे आणि टीम वर्कमुळे आम्ही या सहकाऱ्यांना कोरोना च्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी आजपर्यंत 100 टक्के यशस्वी ठरलो आहोत.


कोरोना झालेल्या व्यक्तींना मानसिक आधाराची, पाठबळाची मोठी गरज असते. त्या व्यक्तीशी नेहमी सकारात्मक बोलत रहायलाच हवे असते.
आजतागायत राचकोंडा पोलीस कार्यक्षेत्रात आमचे 570 पोलीस सहकारी कोरोनाने affected झाले आणि त्यातले 400 पुन्हा ड्युटी वर जॉईन झाले .परंतु 100 % आजपर्यंत recovery rate लक्ष्य कसं साधले ते सांगण्याचा खटाटोप या लेखात मी करत आहे.


1 कोरोना टेस्ट पॉसिटीव्ह आल्यानंतर त्याच दिवशी पोलीस आयुक्त नात्याने मी आणि वरीष्ठ सहकारी फोन करून कोरोना झाला म्हणून घाबरू नकोस, सर्व पथ्य पाळ, यापूर्वी तुझ्या सहकाऱ्यांनी त्यावर यशस्वी मात केली आहे, 24 तासात तुला आपले कन्सल्टंट डॉ. अविनाश किंवा डॉ सरिता यांचा फोन येईल व ते सर्व मार्गदर्शन तुला करतील, औषधे व dry fruits चा पॅक तुझ्या घरी आजच येत आहे, बँक अकाऊंट ला 5000 रुपये जमा करत आहोत, तुला कोविड पॉझिटिव्ह व्हाट्सएपच्या ग्रुपवर सामील करत आहोत आणि या ग्रुपवर 24 तास डॉक्टर आणि वरिष्ठ अधिकारी उपलब्ध आहेत , कुठल्याही emergency मध्ये तू केव्हाही contact करू शकतोस/ शकतेस असा दिलासा कोरोना पॉसिटीव्ह कर्मचाऱ्यांना दिला जातो.
2 दोन ते तीन दिवसानंतर सर्व पॉसिटीव्ह सहकाऱ्यांसाठी झूम कॉल वर ऑनलाइन समुपदेशन केले जाते. त्यात माझ्या सोबत , डॉ अविनाश/ डॉ सरिता, अतिरिक्त पोलीस आयुक्त, अतिरिक्त उप आयुक्त ( administration), नुकतेच बाहेर पडलेले सहकारी व्हिडिओ conference द्वारा प्रत्यक्ष संवाद साधत कुणाला काही symptoms आहेत का? कुणाला हॉस्पिटलमध्ये पाठवणे गरजेचे आहे का? घरातल्या व्यक्तींची टेस्ट झाली का? काही सामाजिक आणि इतर अडचण आहेत का? या विषयी विचारपूस आणि मार्गदर्शन करतो.


3 99% सहकारी होम quarantine मधेच आहेत. ज्यांना कोमोरबीडीटी आहे आणि सिम्पटोम्स आहेत व वैद्यकीय मदतीची गरज आहे त्यांना केवळ आम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल करत आहोत. आणि तेथे आमचा एक अधिकारी प्रत्यक्ष coordination साठी असतो. सर्व वरीष्ठ आणि ड्युटी डॉक्टर बरोबर आम्ही नियमित बोलतो. कोरोना पॉसिटीव्ह दोन सहकाऱ्यांना emergency situation मध्ये हॉस्पिटलला आमच्याच सहकाऱ्यांनी plasma डोनेट केला आणि आज ते घरी आहेत. अतिशय क्रिटिकल situation मधूनही व्हेंटिलेटरवरील सहकारी पण बाहेर येत आहेत. त्याचा आनंद शब्दात सांगणं अवघड आहे.


4 ड्युटीवर रुजू होण्यासाठी आम्ही 15 दिवसानंतर RTPCR टेस्ट करून ती negative आल्यावरच 20, 21 व्या दिवशी रुजू करून घेतो. त्यांचा मोठा सत्कार करून एक प्रशंसा पत्र व भेट वस्तू देतो आणी त्यांचे अनुभव ऐकतो. अनेक जण ते सांगताना भावनाविवश होतात. त्याच बरोबर plasma donation साठी सिम्पटोमॅटिक सहकाऱ्यांना समुपदेशन ही करतो. मला वाटते की कोरोना च्या लढाईत आपण एकटे नसून पूर्ण पोलीस यंत्रणा आपल्या मागे आहे हा दिलासा नक्कीच कोठेतरी त्यातून लवकर बाहेर पडण्यासाठी कामी येत आहे.


हे सर्व इथे लिहिण्याच कारण की मित्रानो कोरोनाला घाबरून चालणार नाही आपल्याला त्याच्या सोबत आता जगायचं आहे. तेव्हा सर्व जण काळजी घ्या आणि सकारात्मक राहा. आपल्याला ही लढाई औषध बाजारात येईपर्यंत नक्किच लढायची आहे . पानिपतच्या तिसऱ्या रणसंग्रामाच्या काळात मराठा आणि नजीबखान रोहिला यांच्यातील लढाईत दत्ताजी शिंदे यांनी जीवाची बाजी लावून अप्रतिम पराक्रम दाखवला. जेव्हा नजीब त्यांच्या वर कपटाने वार करत त्यांना विचारतो ,' क्या पाटील लढोगे?' तेव्हा चे दत्ताजीचे शेवटचे उदगार आठवतात, "बचेंगे तो और लढेंगे".
लढणं आपल्या हातात आहे आणि सर्वांची साथ घेत, सर्वाना साथ देत जिंकण्यासाठीच आपल्याला लढायचं आहे.


आयुक्त महेश भागवत यांची ही योजना नक्कीच आदर्शवत आहे. आपल्या सहकाऱ्यांना संकटकाळात आधार देणे हेच खरं नेतृत्व.


Police Transfer | पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या 5 सप्टेंबरपर्यंत स्थगित, राज्यपालांच्या आदेशाुसार मुदतवाढ