चंदीगड: अनैतिक संबंधाची कुणकुण लागल्यानं प्रियकरांच्या साथीन दोन सुनांनी आपल्या सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमधील कपूरथला गावामध्ये ही घटना घडली आहे.
सासूची हत्या करुन पोलिसांनाही चकवा देण्याचा प्रयत्न या दोन्ही सुनांनी केला. चोरीच्या उद्देशानं सासूचा खून झाल्याची बतावणी दोन्ही सुनांनी केली. पण पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच दोघींनीही आपला गुन्हा कबूल केला. पोलीस चौकशीत समोर आलं की, मोठी सून राजिंदर कौरचं एका व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. तर दुसरी सून राजबीर कौर हिचं देखील एका तरुणाशी सूत जुळले होते.
काही दिवसांपूर्वी दोन्ही सुनांच्या अनैतिक संबंधाची कुणकुण त्यांची सासू स्वराज कौर हिला लागली. या दोघींचे पती हे कामानिमित्त परदेशात राहतात. त्यामुळे या दोन्ही सुना आपल्या सासूच्या जेवणात अमली पदार्थ टाकून होत्या. ज्या दिवशी स्वराज कौरचा खून झाला त्यावेळी घरात दोन सुना आणि त्यांची तीन मुलं देखील उपस्थित होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघी सुनांनी प्रियकरांच्या साथीनं सासूला मारण्याचा कट रचला. 4 फेब्रुवारीला त्यांनी स्वराज कौरला झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्यांनी तिच्या तोडांवर उशी दाबून आणि लोखंडी रॉडनं डोक्यावर प्रहार करुन हत्या केली.
त्यानंतर दोन्ही सुनांनी घरात चोरी झाल्याचा कांगावा केला. दरम्यान, पोलिसांनी स्वराज कौर यांच्या भावाच्या तक्रारीनुसार गुन्ह्याची नोंद केली. त्यानंतर तपासाची चक्रं वेगाने फिरवत त्यांनी चारही आरोपींना अटक केली.