मुंबई : पाच हजार रूपयांच्या जामीनावर अभिनेत्री श्रुती उल्फतची सुटका, कोब्रा गळ्यात घालून फोटो काढल्याने सुनावली होती न्यायालयीन कोठडी


-------------------

बार्शी : बार्शीचे माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्यावर फार पूर्वीपासून आमची नजर होती - मुख्यमंत्री

-------------------

औरंगाबाद : डॉक्टरला धमकावून खंडणी मागणारे दोघेजण पोलिसांच्या अटकेत, डॉ. अनुप टाकळकर बंदुकीचा धाक दाखवून 25 लाखांची खंडणी मागितली

-------------------

पुणे : महापालिकेच्या निवडणुकीनंतर, शिवसेनेने पाठिंबा काढून घेतल्यास दिडशे आमदार भाजपच्या विरोधात... - अजित पवार

-------------------

मुंबई : मतदानाआधी भाजपवर दबाव टाकण्यासाठी शेवटच्या सभेत शिवसेनेचे मंत्री पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे राजीनामे सोपवण्याची शक्यता

-------------------

मुंबई : गळ्यात कोब्रा साप घेऊन व्हिडिओ चित्रीत केल्यामुळे टीव्ही अभिनेत्री श्रुती उल्फतला 16 फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी, श्रुतीच्या वकिलांकडून जामीनाचा अर्ज

-------------------

नवी दिल्ली : उपहार जळीतकांडाप्रकरणी बिल्डर-डेव्हलपर गोपाळ अंसल यांना एक वर्षाचा तुरूंगवास देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा बहुमताने निर्णय, बंसल यांना सुनावलेली 30 कोटी रूपयांच्या दंडाची शिक्षा कायम

-------------------

1. राजीनामा खिशात घेऊन फिरतो, मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिवसेना नेत्यांचा इशारा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी

2. पारदर्शी कारभारात मुंबई पालिकेला शून्य गुण, मुलुंडच्या सभेत मुख्यमंत्र्यांचा वार, तर शिवसेनेनं मुंबईचा पाटणा केल्याचा आरोप

3. फडणवीस सरकारच्या काळात 65 हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पुण्यातील सभेत पुन्हा भाजप नेते गिरीश बापटांची जीभ घसरली, जाणीव होताच सारवासारव

4. 24 तासात रेल्वे रुळावर 3 दुर्घटना होता होता टळल्या, अकोल्यात रुळावर मोठा दगड, पनवेलमध्येही 2 ठिकणी रुळावर लोखंडी रॉड

5. नोटाबंदीचं समर्थन करताना पंतप्रधान मोदींची मनमोहन सिंहांवर टीका, संतप्त काँग्रेस नेत्यांचा सभात्याग

6. हैदराबादमध्ये आज भारताचा बांग्लादेशशी कसोटी सामना, अजिंक्य रहाणेला अंतिम अकरात संधी मिळण्याची शक्यता