पॉर्न व्हिडीओ दाखवून माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Apr 2018 05:20 PM (IST)
पंजाबमध्ये माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या घटनेतील आरोपी हे पिता-पुत्रं असल्याचं समोर आलं आहे.
NEXT
PREV
चंदीगढ : देशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण, पंजाबमध्ये माजी आमदाराच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, या घटनेतील आरोपी हे पिता-पुत्रं असल्याचं समोर आलं आहे.
आत्मा सिंह आणि अमनदीप अशी दोघांची नावं असून, त्यांच्याविरोधात पंजाबच्या जोगा पोलीस स्थानकात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी पीडित मुलीचं गेल्या तीन महिन्यांपासून लैंगिक शोषण करत होते.
दोन्ही आरोपी कपडे व्यापारी असून, पीडित मुलीच्या आईसोबत त्यांचा चांगला परिचय होता. वडिलांच्या निधनानंतर, पीडित मुलगी आपल्या आईसोबत राहात होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने, पीडित मुलीला शेजाऱ्यांकडे घरकाम करत असे.तिच्या याच परिस्थितीचा फायदा उचलत, दोन्ही आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून तिचं लैंगिक शोषण करत होते.
तसेच, कुणालाही सांगू नये, यासाठी तिला धमकावतही होते. विशेष म्हणजे, आरोपी आत्मा सिंह पीडित मुलीला पॉर्न बळजबरीने पॉर्न दाखवून तिच्यावर बलात्कार करायचा.
दरम्यान, सोमवारी देखील आरोपी पिता-पुत्रांनी पीडित मुलीचं लैंगिक शोषण केलं. त्यानंतर, तिने स्थानिक पोलिसात दोघांविरोधात तक्रार दाखल केली. सध्या दोन्ही आरोपी फरार असून, आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -